Submitted by atulgupte on 18 May, 2011 - 04:25
एका दाट काळोख्या रात्री
चाललो होतो मी दूर गावी
मनात होती सारखी भीती
नव्हती सुरक्षतेची खात्री
जीवात नव्हता माझा जीव
येत होती स्वताचीच कीव
चेहऱ्यावर होता भीतीचा भाव
तोंडात होते देवाचे नाव
कुत्र्यांचे स्वीकारत आव्हान
स्विकारीत रातकिड्यांचा मान
तोडीत मी अंधाराची शान
शोधीत होतो माझे स्थान
अचानक झाला साशात्कार
भीतीचा बाण गेला आरपार
फोडली किंकाळी मी घाबरून
भूत उभा होता माझी वाट आडवून
ऐकताच किंकाळी, शेतकरी
आला घेऊन कंदील हाती
पाहता कंदिलाच्या प्रकाशात
आले जे माझ्या ध्यानात
माझेच मला येत होते हसू
वाटले नव्हते इतके भित्रे असू
माझी वाट अडवून भूत नव्हता उभा
शेताच्या रक्षणासाठी बुजगण होता उभा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अले बाप ले ! हॉण्टेड ३ डी ला
अले बाप ले !
हॉण्टेड ३ डी ला जाणार त्या दिवशी संध्याची कविता वाचली आज रागिणी एमएमएस ला जाऊ म्हटलं तर ही कविता... ..दोन्ही शिनेमे -हायले
लिहीत रहा..
धन्यवाद हि कविता मी १९८३ मधेय
धन्यवाद
हि कविता मी १९८३ मधेय लिहिली होती आणि या साठी मला काव्य स्पर्धेत बक्षिश मिळाले होते