अतुल गुप्ते कलवा

प्रीतिचि पाखरे

Submitted by atulgupte on 25 March, 2011 - 04:45

वर्षानु वर्षे जळते हृदयात माझ्या सुख्स्वप्नांची होळी
अश्रुंच्याही झाल्या वाफा, अंधार दाटला आभाळी

सागरास हि धरणी मिळाली चंद्रमास या तारका
परी ना मज कुठे गवसली माझी लोभस प्रेमिका

लाजरी बुजरी सदा हासरी हट्टी तापट तरी भावली
दोन शरीर पण जीव एक हा, होती माझी ती सावली

कधी अचानक कुठून आले वादळी ते भोवरे
उजाड झाले प्रेमरान अन उडाली प्रीतीची पाखरे

अतुल गुप्ते

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - अतुल गुप्ते कलवा