Submitted by atulgupte on 25 March, 2011 - 06:50
गर्दीत माणसांच्या एकलाच राहिलो मी
वाटेवरी प्रीतीच्या एकटाच चाललो मी
डोळ्यातील आसवांचे जाहले लाल रक्त
हृदयात साजनीची उरली याद फक्त
ओठावरील शब्द निशब्द आज होते
कळले कधी ना तुला ते नाव तुजेच होते
होतीस साजणी तू राणी माझ्या हृदयाची
झालीस आठवण तू सोडून साथ साजणाची
न सांगताच गेलीस तोडून सर्व नाती
वेचीत राहिलो मी विखुरलेले मोती
शोधिले नयनांनी परी तू कुठेच नव्हती
छबी साजनीची माझ्या ओंजळीत होती
माझ्या ओंजळीत होती ............
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
विरह वेदना चांगली व्यक्त झाली
विरह वेदना चांगली व्यक्त झाली आहे.
पण ते "साजनी"च्या ऐवजी "साजणी" हवे होते ना?
हो बरोबर आहे तुमचे परंतु ण
हो बरोबर आहे तुमचे परंतु ण टायीप झाला नाही