Submitted by atulgupte on 19 May, 2011 - 03:12
पापण्या मिटुनी जे पहिले
ते स्वप्न सत्य जाहले
हृदयातील आरश्यात
रूप तुझे मी देखिले
दोन जीवांचा अढळ दुरावा
तू हृदयातून संपवला
सुन्या सुन्या मैफिलीस माझ्या
सूर प्रीतीचा लाभला
काळे भोर केस तुझे हे
ज्यामध्ये मी गुंतलो
सजविण्यास आज त्यांना
मीच फुल जाहलो
अल्लड नील नयन देखणे
पाहताच मी ग भुललो
जगविण्यास आज त्यांना
मीच काजळ जाहलो
रूप मोहक सुंदर लोभस
मनोमनी मी बहरलो
काव्य रूप देण्यास त्याला
मीच शब्द जाहलो
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा