माय मराठी

वैभवशाली मराठी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 February, 2019 - 00:54

वैभवशाली मराठी

ज्ञानदेवी बोले । मर्‍हाठी सोज्वळ । जाये परिमळ । दाही दिशा ।।

तुकयाची गाथा । मर्‍हाठाचि बोल । सर्वदा सकळ । लोकमान्य ।।

शाहीर गर्जतो । पोवाडा गर्वाने । छाती अभिमाने । फुलतसे ।।

नवरसपूर्ण । समृद्ध भांडार । भाषा हीच थोर । आम्हांलागी ।।

मर्‍हाठी भाषेचे । ऋण न फिटेचि । माऊली आमुची । जन्मोजन्मी ।।

माय मराठी

Submitted by मोहना on 26 February, 2019 - 21:19

"ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,

शब्दखुणा: 

आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

Submitted by गणेश पावले on 4 June, 2015 - 01:27

☼ आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

जन्म घेवू पुन्हा येथे राखू स्वराज्याची लाज,
मातीसाठी मरू कितीदा घेवू शपथ आज.

माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी,
करू अभिषेक रक्ताचा आज मिळून रायरेश्वरी.

पातशाहीचा बिमोड करू राखू लाज मुलुखाची,
प्राणपणाने स्वराज्य मिळवू इच्छा हि "श्री" ची.

आई भवानी आहे साथीला उंच उभारू भगवा,
तुकडे करू राई एव्हढे आलाच जर गनीम आडवा.

सह्याद्रीची उत्तुंग शिखरे साद घालिती आम्हास,
स्वराज्याचं तोरण बांधून रक्षु हिंदू धर्मास.

हर हर महादेवाचा नारा आता अटकेपार गर्जुदे,
मावळा लढण्यास सज्ज आई हिंदवी स्वराज्य स्थापु दे.

Subscribe to RSS - माय मराठी