आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

Submitted by गणेश पावले on 4 June, 2015 - 01:27

☼ आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

जन्म घेवू पुन्हा येथे राखू स्वराज्याची लाज,
मातीसाठी मरू कितीदा घेवू शपथ आज.

माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी,
करू अभिषेक रक्ताचा आज मिळून रायरेश्वरी.

पातशाहीचा बिमोड करू राखू लाज मुलुखाची,
प्राणपणाने स्वराज्य मिळवू इच्छा हि "श्री" ची.

आई भवानी आहे साथीला उंच उभारू भगवा,
तुकडे करू राई एव्हढे आलाच जर गनीम आडवा.

सह्याद्रीची उत्तुंग शिखरे साद घालिती आम्हास,
स्वराज्याचं तोरण बांधून रक्षु हिंदू धर्मास.

हर हर महादेवाचा नारा आता अटकेपार गर्जुदे,
मावळा लढण्यास सज्ज आई हिंदवी स्वराज्य स्थापु दे.
हिंदवी स्वराज्य स्थापु दे… !!

कवी - गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान (मुंबई)

*****************

Group content visibility: 
Public - accessible to all site users