परदेशातील महाराष्ट्र/मराठी मंडळे आणि मायबोली वाहिनी

Submitted by कौतुक शिरोडकर on 4 February, 2015 - 11:29

नमस्कार !!!

सध्या मायबोली वाहिनीवर क्रिएटीव्ह या पदावर मी कार्यरत आहे. या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी मराठी भाषेशी निगडीत काही उपक्रम राबवावे हा विचार आहे. कौशल इनामदार यांच्यासोबत 'मराठी अभिमानगीत' या विषयावर एक कार्यक्रम, मराठी भाषेच्या थोरवीबद्दल सिनेनाट्यकलावंत व कवीलेखक यांची मते, इंग्रजी कवितांशी तोंडओळख असलेल्या लहान मुलांकडून बडबडगीते असे काही करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर परदेशात मराठी भाषा, संस्कृती, चालीरिती जतन करणार्‍या महाराष्ट्र मंडळांना संधी द्यावी हा एक विचार मनात आला. त्या निमित्ताने काय करता येईल ही त्याची चाचपणी.

परदेशस्थित मराठी मंडळांचे कार्यक्रम किंवा त्याच्या झलकी दाखवता येतील असं मला वाटते. फक्त त्यात कॉपीराईटचे उल्लंघन होता कामा नये. काही अटीतटी या दुर्दैवाने असतातच. पण तरीही काही ना काही करावं हे मनापासून वाटतय. ज्या मंडळांना व्हिडीयो पाठवणे शक्य असेल त्यांनी मला skautuk@gmail.com वर नक्की मेल पाठवावा. काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे. यात मनोरंजन हा नक्कीच महत्त्वाचा भाग असेल.

वॅलेन्टाईन डेच्या दिवशी आपल्या मित्रमंडळींच्या प्रेमकविता घेऊन काही करावं हा विचार मी मांडताच अनेकांनी कविता पाठवल्या होत्या. पण काही कारणास्तव तो कार्यक्रम बारगळला. त्याबद्दल मी समस्त मित्रपरिवाराची जाहिर माफी मागतो. पण हा कार्यक्रम सफल करण्याची जिद्द आहे. तुमच्या सुचना आणि प्रतिक्रियांच स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतूक...
जिव्हाळ्याचा विषय...
मराठी मंडळामधून असे कार्यक्रम होतच असतात. गणपती/दिवाळी/होळी असे सणही साजरे केले जातात.
पण या गोष्टींचे Recording सगळीकडे केले जात नाही. आणि केले गेलेच तर ते व्यैयक्तिक कॅमेर्‍यावर केले जाते.
त्यात कॅमेरावाल्याचा कुणीतरी रंगमंचावर असतो, आणि बहुतेक Recording त्या व्यक्तीचे केले जाते. दर्जा सुमार असतो.

मायबोली चॅनेलवर तुम्हाला Recording दाखवायचे असेल तर काय करायला लागेल?
'उभ्या उभ्या विनोद'च्या निमित्ताने अमेरिकेतल्या बहुतेक मोठ्या मराठी मंडळात मी जाऊन , कार्यक्रम करून आलेलो आहे. तिथे काय आणि कसे चालते ते पाहिले आहे, म्हणून डो़कं घालतोय.
प्रताधिकार हा वेगळाच प्रश्न आहे.. त्याबद्दल नंतर..

विनय, जर काही चांगले रेकॉर्‍डींग असतील तर नक्की पाठव. प्रताधिकारांच पहाव लागेलच म्हणा. काय उपलब्ध आहे ते कळव. Happy

सध्या (या वीकांताला) आम्ही 'उभ्या उभ्या विनोदचा' प्रयोग करणार आहोत बॉस्टन मंडळात.
आमच्या कार्यक्रमाला प्रताधिकार आमचाच असतो (कारण तो आम्हीच लिहीलेला असतो).
रेकॉर्डिंगचे काय करता येईल बघतो.... (लाईट वगैरे धड नसतात बहुतेक ठिकाणी)...

बृमम ची बातमी इथे आहे..

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5433311633384953635&Se...

यंदा प्रथमच २७ फेब्रुवारीला आम्ही Orlando मधली (मूठभर) मराठी मंडळी जमून मराठी भाषा दिवस साजरा करणार आहोत. स्वत:च्या कविता\ विडंबन कविता वाचणार आहोत आणि मराठीबद्दल लहान मुले आणि मोठ्यांचे पण काही खेळ घेणार आहोत. हे सगळे २७ लाच होणार असल्याने तुम्हाला आधी काही पाठवता येणार नाही. पण इथे जवळच Tampa मध्ये अभिरुची नावाचे एक वार्षिक निघते त्यांच्या वर्धापनदिनी गेल्या वर्षी मराठी कवितांचे रसग्रहण या स्वरूपाचा कार्यक्रम मी केला होता ( माबोच्या भाषेत रिक्षा फिरवणे) त्याचा video ( फार चांगली quality नाहीये) तुम्हाला हवा असल्यास पाठवू शकते, कार्यक्रम माझा स्वत:चा असल्याने प्रताधिकाराचा प्रश्न येऊ नये.

कौतुक, मी सध्या रिचमन्ड मधे आहे तुम्ही तुमचा कॉटक्ट नंबर सपर्कातुन देवु शकता का. आम्ही पण इथे मराठी मंडळाच्या माध्यमातुन बरेच कार्यक्रम करतो त्यामुळे मी मंडळाशी बोलुन तुम्हाला याचि माहिती देवु शकेन.

'वाट्टेल ते' ... आपण 'माबो' असल्याने बोलला नाहीत कधी (म्हणजे फ्लोफ्लोरिडामधे मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा..)

....

गोष्टीगावाचे, तुम्ही इथे आला होतात तेव्हा लक्षात नाही राहिले माबोबद्दल बोलायचे. तसेही मी इथे फक्त वाचते आणि प्रतिसाद अगदी तुरळक

कौतूक.. छान उपक्रम. ऑस्ट्रेलियात सिडनि येथे होणार्‍या कार्यक्रमाबद्दलपण माहिती पाठवतो..

धन्यवाद ! माझा सेल क्रमांक आहे ८३०८३१६३१६. पण शक्यतो मेल पाठवा. वेळा जुळतीलच असं नाही. फेबू मॅसेंजर वर बोलता येईल. व्हिडीयोज पाठवा. बघू काय करता येते ते.

जमल्यास इतर मंडळाना पण कळवा. Happy