पाककृती

माबो ज्युनिअर शेफ्स - बच्चेकंपनींना करतायेण्याजोग्या पाककृतींचे संकलन

Submitted by लाजो on 2 July, 2012 - 23:33

इथे बच्चेकंपनींना करता येण्याजोग्या पाककृती, टीप्स, आयडियाज इथे शेअर करू या Happy

सुरुवात करण्याआधी काही साध्याच पण महत्वाच्या गोष्टी:

स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सनी घ्यायची काळजी:

१. हात स्वच्छ साबण लावुन धुवुन घावेत.
२. केस नीट बाधुंन घ्यावेत.
३. साधे, अंगासरशी कॉटनचे कपडे घालावेत.
४. सूरी, कात्री, किसणी इ इ धारधार वस्तु वापरताना आई बाबांची मदत घ्यावी. बाजारात कमी धार असलेल्या मुलांना वापरता येण्याजोग्या सुर्‍या/कात्र्या मिळतात त्या वापराव्यात.

विषय: 

एक जळाऊ पाककृती.

Submitted by इब्लिस on 6 March, 2012 - 13:36

कांदा कैरीचा कुस्करा असा एक चविष्ट प्रकार मी जस्ट खाऊन संपवला आहे.
तुम्हा सर्वांना जळवण्यासाठी खाली फोटू टाकीत आहे.
आज (म्हणजे १२ वाजून गेलेत म्हणून) होळी.
होळी पेटल्याशिवाय थंडी संपत नाही. पण तरीही मी 'कैरी' घालून केलेली पाकृ खाल्ली हे तुम्हा सग्ळ्यांना जळवण्यासाठी इब्लिसपणे पोस्ट करतो आहे:
2012-03-06 23.39.05.jpg
वरील फोटू मधे कांदा, कैरी व कोथिंबीर चिरून ठेवलेली दिसत आहे.

2012-03-06 23.39.43.jpg

पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा

Submitted by मदत_समिती on 21 July, 2011 - 03:45

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्ही प्रकाशचित्रे साठवू शकता.

पाककृती लिहिताना मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" हा पर्याय दिसत नाही. तेव्हा, प्रतिसादाच्या खिडकीत जाऊन "मजकुरात image किंवा link द्या" हा दुवा आहे त्यात "image" या पर्यायावर टिचकी मारा.

1st.JPG

उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा. तुमच्या मजकुराच्या खिडकीत Image tag येईल.

मायबोलीवरील आहार व पाककृती विभागात पाककृती कशा शोधाव्यात.

Submitted by मदत_समिती on 29 October, 2010 - 13:33

पाककृती विभागातील वर्गीकरण पद्धत :
पाककृती ग्रुपच्या पानावर जा
तिथे अवलोकन विभाग समोर असेल, त्यात सगळ्या पाककृती प्रतिसादाच्या वेळेनुसार क्रमवारित दिसतील.
अवलोकन याशेजारी विषयवार यादी असा टॅब दिसेल.

त्यावर क्लिक केले असता खालील प्रमाणे ६ ओळी दिसतील.
* आहार (940)
* पाककृती प्रकार (1056)
* प्रांत/गाव (4)
* प्रादेशिक (608)
* विषय (124)
* शब्दखुणा (1531)

शब्दखुणा: 

माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककृती