राम होय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 June, 2019 - 13:24

राम होय
******
अमूर्ताचा गाभा
प्रेमाचिया ओघा
भक्तांचिया लोभा
राम होय ॥

शब्दातीत सत्य
मनाच्या अतित
दिसण्या किंचित
राम होय ॥

निर्गुणाचे शून्य
आकार लेवून
सगुणी सजून
राम होय ॥

इंद्रियावगम्य
प्रज्ञा प्रावरण
प्रेमाला भुलून
राम होय ॥

विश्वाचे कारण
विश्वाला व्यापून
उरे शब्द दोन
राम होय ॥

लौकिका सोडून
जाणीवी जगून
विक्रांतचे स्वप्न
राम होय ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
।०००००

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा हा! सुंदरच.

लौकिका सोडून
जाणीवी जगून
विक्रांतचे स्वप्न
राम होय ॥>>> भारी.

नको ऐहीकाचा नाथा व्यर्थ बडीवार. हे आठवलं.