लहान माझी भावली

Submitted by मनिम्याऊ on 9 July, 2018 - 02:46

काल रविवारी स्वीटकॉर्नचे कणीस सोलत असताना माझी लेक (वय वर्षे १८ महिने) एकदम excite होऊन म्हणाली. फ्लोक... फ्लोक (फ्रॉक).. आणि हट्ट धरून बसली की आताच्या आत्ता मला काणसाची डॉल बनवून पाहिजे.
मग काय जरा आयडियाची कल्पना लावली

मग कणीस उलवून एका पेल्यात उभं केलं. त्यावर डोकं म्हणून एक कांदा बसवला. काणसाचेच केस लावले. आणि दोन छोटे छोटे लवंगीचे डोळे.. कमरेला रिबीन डोक्यावर टोपी असा थाट केला..

आणि तयार झाली ही छोटीशी भावली..

IMG_20180708_161708.jpg

लेक खुश.. Happy

Group content visibility: 
Use group defaults

ब्येस्ट..
लहान असताना काहीही चालतं मन रमवायला, मोठं झाल्यावर सगळं असुनही जे नाही त्याचा विचार करुन मन रमत नाही..

खुप छान, तुमची लेक खुश झाली हे सर्वात महत्वाचे, लहान मुले छोट्या छोट्या गोश्टीत आनंद शोधतात जे मोठे झाल्यावर जमत नाही ईतकेसे

मन:पूर्वक धन्यवाद अग्निपंख दादा, शशांक दादा.
आणि VB ताई, खरंच लेक खुश झाली हे सर्वात मोठे सर्टिफिकेट मिळाले मला.