मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
हस्तकला
कलाकारी उद्योग - १६ " पिटुकले बॉक्सेस "
पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)
नमस्कार मंडळी !
झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . . तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . . दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.
मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.
हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील - मागच्या वर्षीचा अॅड केला आहे
हा मागच्या वर्षी केलेला -
ह्याचे स्टेप बाय स्टेप फोटो नाही घेतले गेले :(. पंचकोनाला षटकोन चिकटवला आहे
हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील -
पॉलिमर क्ले ची कला आणि इतरही काहीबाही
माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.
साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.
पेन स्टॅन्ड .......
शाळेचं वेळापत्रक आणि चटई
लेकीची शाळा, नविन वर्षं सुरू झालं आणि अचानक मला माझ्या शाळेतली एक गमाडीगंमत आठवली. लेकीला ती शिकवण्याच्या निमित्ताने बर्याच दिवसांनी हस्तकलेचा अनुभव घेतला.
ती गंमत म्हणजे शाळेचं वेळापत्रक. आठवतंय का कोणाला? पुठ्ठ्याचं, दोन्ही बाजूनं उघडणारं आणि जादूनं केवळ तीनच दिवसांचं वेळापत्रक दाखवणारं? आठवलं?
कलाकारी उद्योग - १४ " मासिकातील कागदांची विणलेली पर्स "
कृती किचकट आहे; बर्याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.
या आधीचे उद्योग
कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder "
फॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.
cd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.
कृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
हॅल्लो किटी आणि अॅंग्री बर्ड
दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट
ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.
हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.
ही मुग्गीसाठी
आणि ही मुग्ग्यासाठी
माझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..
Pages
