साधारण दोनेक वर्षांपूर्वी ही कल्पना मनात उगम पावली. आजूबाजूला अनेक मित्र मैत्रीणी छान छान कलापूर्ण आणि कौशल्यपूर्ण वस्तू करत असताना बघत होते. त्याचवेळी अशा वस्तूंना मागणीही खूप असते असं लक्षात आलं आणि मग यासाठी एक वेबसाईट सुरू करावी असा विचार डोक्यात घोळायला लागला. मग काही महिन्यांपूर्वी खरंच पावलं उचलली आणि आनंदाची बातमी ही की मी नुकतीच सर्व प्रकारच्या कला-कौशल्याच्या वस्तू विकण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. www.skillproducts.com
हा आमचा पेपेर मॅशे वापरून बाप्पा बनवायचा प्रयत्न.
पेपर मॅशे बनवण्यासाठी रद्दी पेपरांचे तुकडे करून ते पाण्यात ४-५ दिवस भिजत ठेवले मग मिक्सर मधून त्याचा लगदा करून घेतला ( ते काम अर्थातच आईने केल ).हा तो लगदा.

नंतर तो लगदा १ दिवस वाळवला अन परत मिक्सरला फिरवला.
या धाग्यावर फोटो जास्त झाल्यामुळे अपलोड व्हायला त्रास होत आहे त्यामुळे हा नविन धागा काढलाय. यापुढे नविन फोटो मी इथे शेअर करेल.. तुम्हीपन तयार केलेल सॅटीनच काम इथं शेअर केल्यास आवडेल..
बर्याच लोकांनी मागे मी दिलेल्या हेअरबेल्ट ची कृती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.. लि़ंक त्यावर दिली आहे तरीही फोटोद्वारे ती समजवुन सांगण्याचा हा प्रयत्न.. तुमच्या आवडत्या रंगांना घेऊन तुम्हीसुद्धा हे तयार करा आणि बनवल्यावर त्याचे फोटो शेअर करा :)..
हा बेल्ट :
हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे
.
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच 
प्रचि १.

प्रचि २.

हेअरक्लीप्स च्या बॉक्स मधे जोड हरवलेली एक पिन सापडली तिथुन सुरु झालेला हा प्रवास ..
मग विचार आला भाचीचा आणि हात वळत गेले परिणाम तुमच्या समोर ...
१.
२. 
३. 
लागणारे जिन्नसः
मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.
कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग व्यवस्थित हलवून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण पातळ वाटू शकते. घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.
आता गुलमोहर - इतर कला या धाग्यावर टवाळक्या करत होती तेव्हा जागू ताईंच http://www.maayboli.com/node/42348 हे काम दिसल ... म्हटल आपला पण हा उद्योग दाखवावा म्हणून हा प्रपंच . या पॉट ला तब्बल ७ वर्ष झाली अजुनही ठणठणीत आहे .. एकही मणी निघाला नाही त्याचा ..
घरी मातीच एक छोटस पॉट होत .. त्यावर केलेला हा प्रयोग ..
१. त्या पॉट ला काळ्या ऑईल पेंट चे दोन थर दिले ..
२. साडी व तत्सम कलाकुसरी मध्ये वापरन्यात येणार्या मण्यान्चा व पाईपचा वापर करुन फेविकॉल च्या सहाय्याने त्यांना चिकटवले ..
साहित्य:- वर्तमान पेपर,फेव्हिकॉल,कटर,गोडतेल,पाणी,प्लास्टिकचा लहान डबा ई.
कृती:- प्लास्टिकच्या डब्याला बाहेरून ब्रशने थोडे गोडतेल लावा. नंतर फेव्हिकॉल मध्ये थोडे पाणी टाकुन फेव्हिकॉल थोडा पातळ करा.आता वर्तमान पेपराच्या 1ईंच मापाच्या आडव्या/ऊभ्या पट्टया कापा. कापलेल्या पट्टीना एका बाजुने फेव्हिकॉल लावून एकएक पटटी प्लास्टिकच्या डब्याला चिकटवा.अशा प्रकारे दहा ते बारा थर लावा.व तो डबा पुर्ण वाळु द्या. वाळल्यानंतर प्लास्टिकचा डबा हळुव काढुन घ्या.

![]()