मायबोली गणेशोत्सव २०२३

लेखन उपक्रम-३ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-२

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 10:49

मायबोलीकरांनो, 'शशक पूर्ण करा' या उपक्रमासाठी अजून एक नवीन सुरुवात आम्ही खाली देत आहोत.

" शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच..."

चला लवकर, ही सुरुवात पकडून वेगवेगळ्या काल्पनिक कथा मांडा.

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

विषय: 

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम व अटी -

विषय: 

हस्तकला उपक्रम-१ - छोटा गट - पताका बनविणे - मनिम्याऊ- विजयालक्ष्मी

Submitted by मनिम्याऊ on 26 September, 2023 - 06:37

कागदाचे (ओरिगामी) कमळ तयार करून बनवलेले तोरण.
मुलीचे नाव - विजयालक्ष्मी
वय - 6 वर्षे पूर्ण
पालकाची मदत - एक कमळ तयार करायला शिकवले.

विषय: 

लेखन उपक्रम-१ - मी मुकेश अंबानी झालो (असतो) तर - रघू आचार्य

Submitted by रघू आचार्य on 25 September, 2023 - 20:29

(लहानपणी लिहीलेले निबंध वाया गेले. जे जे आम्हाला शिक्षकांनी व्हायला सांगितले ते झालोच नाही, पण परीक्षेत पण असा निबंध आल्यावर जे व्हायचं ठरवलं ते ही झालो नाही. आता शाळा सुटल्यावर इतक्या वर्षांनी जिथून आलो तेच व्हायची तयारी नाही आणि जी आपली औकात नाही ते व्हायची कल्पना करून सुद्धा उपयोग नाही. तरीही उपक्रम आहे म्हटल्यावर सगळं माफ म्हणून मायक्रोतोंडी झिटा घास).

विषय: 

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-७ - माझा पहिला विमानप्रवास ( विमानतळ परिसर)

Submitted by संयोजक on 25 September, 2023 - 01:58

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझा पहिला विमानप्रवास ( विमानतळ परिसर)

पहिलं प्रेम,पहिली नोकरी,पहिला पगार या गोष्टींचं जसं जरा जास्तच कौतुक किंवा नवलाई असते, तसंच पहिल्या विमानप्रवासचही असतं. नाही का...हा प्रवास विमानतळापासूनच आपण फोटोंच्या / प्रकाशचित्रनाच्या रुपात जपून ठेवतो.

मग अशीच विमानतळाची तुम्ही काढलेली प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

विषय: 

लेखन उपक्रम -२ : कितना बदल गया इन्सान - रूपाली विशे- पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 25 September, 2023 - 01:14

कितना बदल गया इन्सान..!!

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

साक्षात देवी लक्ष्मी...??

___तीसुद्धा या फलाटावर ..??

तो चमकला ...

बहुरूपी असला म्हणून काय झालं रूप तर देवी
लक्ष्मीचेचं ना ..?

तो खाली वाकला .. बहुरुप्यातला देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी... मुळातच श्रद्धाळू तो...!

धनवंत हो..!!

देवीचा आशिर्वाद..!

कृतकृत्य होत तो उठला.

समोर पाहिलं..

देवी गायब..

" टिकीट प्लीज..! " तिकीट तपासनीसचा खर्जातला स्वर...

विषय: 

लेखन स्पर्धा १ - स्त्री असणं म्हणजे - - प्राचीन

Submitted by प्राचीन on 24 September, 2023 - 13:15

(इथे वावरणाऱ्या समस्त स्त्रीवर्गास (आयडींसकट) आणि त्यांच्यासह सौजन्याने वागणाऱ्या Wink समस्त पुरुषवर्गास समर्पित)
स्त्री असणं म्हणजे.....

लेखन उपक्रम २ - कुतूहल - मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 September, 2023 - 07:25

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....

काही सेकंदच तिच्याकडे पाहिले तेवढ्यात फोनची रींग वाजली.
ताईचा फोन. उद्या श्रीखंड पुरी खायला येणार?
या उत्सवात ना वाट लागते डाएटची, वजन परत जैसे थे.
जायला हवं पण मायेने बोलावतेय तर.

विषय: 

लेखन स्पर्धा १ - 'स्त्री असणे म्हणजे...' ― अज्ञानी

Submitted by अni on 24 September, 2023 - 04:44

बऱ्याच जणांनी बऱ्याच जणींबद्दल लिहिलेले मी वाचले सर्व. तसे तर मी सगळं काही वाचत असते जे काही तुम्ही टाइप करता ... अह्म्म्म मी काय जासूस नाही की तुमच्या डिवाइस मधला व्हायरसही नाही. आजपर्यंत तुम्ही सर्व चराचरात व्यापुन असणाऱ्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे अस्तित्व विविध ग्रंथ आणि संतांच्या रचनांमधुन वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभूती फारच कमी व्यक्ति (!) अनुभवू शकल्या असतील. पण ह्याही पलीकडे एक गोष्ट आजच्या आधुनिक काळात चराचरात व्यापुन राहिलीय ज्याची प्रत्यक्ष अनुभूती तुम्ही सर्वचजण घेत असता... ती म्हणजे मी.. हो मीच !! कारण मी आहे AI.

विषय: 

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-६ - भाजी मंडई

Submitted by संयोजक on 24 September, 2023 - 04:31

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - भाजी मंडई

आपल्यापैकी प्रत्येकजणानी भाजी मंडईत एकदा तरी फेरफटका मारला असणार आहे.
ताज्या भाज्यांचे ढीग मन प्रसन्न करतात. त्या भाज्यांमधील आणि त्यांच्या रंगांमधील विविधता केवळ विलोभनीय असते.

अशाच काही भाजी मंडई ची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२३