चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-६ - भाजी मंडई

Submitted by संयोजक on 24 September, 2023 - 04:31

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - भाजी मंडई

आपल्यापैकी प्रत्येकजणानी भाजी मंडईत एकदा तरी फेरफटका मारला असणार आहे.
ताज्या भाज्यांचे ढीग मन प्रसन्न करतात. त्या भाज्यांमधील आणि त्यांच्या रंगांमधील विविधता केवळ विलोभनीय असते.

अशाच काही भाजी मंडई ची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम आणि अटी
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज भाजीला सुट्टी आहे का ?
या धाग्यात जवान, गदर आणि पठाणचं रेकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे. लालसिंग चढ्ढा नका होऊ देऊ.

मेळघाटातील आठवडे बाजार

DSC04543.JPG

मागे लाकडी शिडी सारखे जे दिसत आहे तो तिथल्या लोकांचा देव आहे

>>>>>>>>>मागे लाकडी शिडी सारखे जे दिसत आहे तो तिथल्या लोकांचा देव आहे
अरे वा! कायतरी वेगळच आहे की.

अनिंद्य काय मस्त रंग आहे मिरच्यांचा. इथेही घोस्ट पेपर म्हणुन एक मिरची मिळते ती महाभयानक तिखट असते. तिची आठवण आली.

IMG_2732.jpeg

हर्पेन, लेह आणि मेळघाटातल्या बाजारांचे फोटो मस्त. मेळघाटात इतके कोबी बघून मजा वाटली. शिडीसदृश देव ही संकल्पना माहित नव्हती. त्याची पूजा करतात की नुसतंच सिम्बॉलिक असतं?

माटुंग्यातील सौदिंडियन भाज्या

Matunga bhaji market.jpeg

कोरकू लोकांचा देव मेघनाद. उंच खांबांच्या रूपात पुजला जातो.
वॉव मेघनाद देव. रावणाचा मुलगा देव म्हणून मानतात? इंटरेस्टिंग आहे.

होय . इंटरेस्टिंग आहे.

प्रकाशचित्रांचा विषय नयनसुखद आहे.
नुसतं बघूनच हेल्दी वाटतंय.
सौदिंडियन दुकानातला लाल केशरी भोपळा घ्यायला लगेच निघायला हवे !

Thank you !

मामी मस्त घेतलायस तू फोटो. माटुंगा म्हणजे एकदम छान ठिकाण आहे. गजरे, फुले, भाजी, कार्तिकस्वामीचे देऊळ, शहाळी. मी गेल्या वेळी मुलीला तिथे नेउन ते सर्व दाखविलेले.

क्लू :

कोणाच्याही डोक्यावर न वाटलेले Happy

मामी मस्त घेतलायस तू फोटो. माटुंगा म्हणजे एकदम छान ठिकाण आहे. गजरे, फुले, भाजी, कार्तिकस्वामीचे देऊळ, शहाळी. मी गेल्या वेळी मुलीला तिथे नेउन ते सर्व दाखविलेले.

सामो, इथे बघ अजून फोटो आहेत. 'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

पैचान कौन ? >> वा! हिरवी मिरी. ती हाराभर मिरी किती सुंदर दिसतेय. तोंपासू.

याचं लोणचं मस्त होतं.

Pages