काफ्का

मराठी भाषा गौरव दिन २०२३ -' द स्टोकर' - फ्रान्झ काफ्का - साजिरा - भाग २

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 1 March, 2023 - 10:17

स्टोकरला वाटलं, आपण चीफ इंजिनियर शुबलबद्दल केलेली कुठचीही एक तक्रार त्याला अद्दल घडवण्यासाठी पुरेशी ठरेल. नंतर मात्र त्याच्या लक्षात आलं, आपण घामाने डबडबतो आहोत. कॅप्टनसमोर धड नीट काहीही आपल्याला सांगता आलेलं नाही आणि आपली दयनीय अवस्था झालेली आहे. कॅप्टन गप्प बसलेला पाहून साशंक झालेला चीफ अकौंटंट नक्की काय करावं हे न कळून स्वतःही चडफडत गप्प बसला होता. तिथला तो नोकरही कॅप्टन नक्की काय बोलतो किंवा आदेश देतो; याची उत्सुकता असल्यागत कॅप्टनच्या तोंडाकडे पाहत राहिला.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन 'द स्टोकर'- फ्रान्झ काफ्का - साजिरा - भाग १

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 10:04

१८८३ साली प्रागमध्ये जन्मलेला फ्रान्झ काफ्का जेमतेम ४० वर्षं जगला. हा थोर लेखक आणि तत्त्ववेत्ता 'अस्तित्ववाद' या संकल्पनेच्या जनकांपैकी एक. जॉं पॉल सार्त्र, आल्बर्ट कामू, गॅब्रिएल गार्शिया ही काफ्काचा प्रभाव पडलेली काही मंडळी. या नावांवरूनच काफ्काचं मोठेपण लक्षात येतं. 'मेटॅमोर्फॉसिस' या एकाच जबरदस्त कथेने काफ्काला लोकप्रिय केलं. अनेक भाषांत अनुवादित झालेल्या या दीर्घकथेची आजही जगभर चर्चा होते. जगण्याचं प्रयोजन शोधण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी काफ्काने बरंच लिखाण केलं खरं; मात्र आपल्या मृत्यूनंतर ते जाळून टाकावं, असंही त्याने आपल्या ब्रॉड या मित्राला सांगून ठेवलं.

विषय: 
Subscribe to RSS - काफ्का