मी कुठे ????

Submitted by पुरंदरे शशांक on 13 July, 2012 - 05:31

मी कुठे ????

लग्नामधल्या अल्बममधे
आईबाबा कस्ले नटलेत
आजीआजोबा तर माझे
अग्दी क्यूटी क्यूटी सजलेत

मावशी आत्या काकू मामी
भारी भारी साड्यांमधे
ईशाताई चिनुदादा
दिस्तात केवढे छोटेसे

स्टेज कसले सजवलेय
माळा काय नी फुले काय
काका, मामा सगळे सगळे
बूट, कोट नि वर टाय

कित्ती वेळा पाह्यला हा
अल्बम मी उलटून पाल्टून
एकपण फोटो माझा
यात नाही जरा म्हणून

कित्ती वेळा विचारलं
आईबाबा नि आज्जीला
सगळे हसत म्हण्तात कसे
कित्ती होतास तू झोपलेला ......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.