शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2012 - 07:12

शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं
बॅग, टिफिन काही नाही
मजेत खेळत बसलेलं

टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालत नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."

"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"

"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."

जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन

सुट्टीत टिफिन उघडला जेव्हा
वर्गात गोंधळ माजला तेव्हा

उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून

शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरातच दंगामस्ती

माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती
डब्याची संपली कटकट नस्ती....

गुलमोहर: 

.

छान

मस्त कविता, एकदम गोडुली. खरच काढा बालकवितांच पुस्तक, मोठी मोठी सुंदर चित्र असलेलं. या कवितेची चित्रं तर अगदी नजरे समोर तरळुन गेली...कविता वाचताना Happy

डब्यातून टुण्ण्कन उडी मारून बाहेर आलेले उंदीरमामा दिसले आणि इतर सगळ्या बालप्राण्यांचे विस्फारलेले डोळे नि त्यांची धावपळही Happy
मस्तच्चे कविता...!

(असा एक संग्रह काढता का?)>>+१. आणि भाऊकाकांकडुन व्यंगचित्रे काढुन घ्या मस्त.

सुट्टीत टिफिन उघडला जेव्हा
वर्गात गोंधळ माजला तेव्हा

उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून >>> धमालच आहे.. Lol

देव काका - चाल खूपच छान - आवडली अगदी....
या कवितेला भरभरुन दाद देणा-या सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार......
असाच लोभ असू देत......

Pages