गोड पावसाचे गाणे

Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2012 - 03:23

गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
पावसात भिजताना गाऊ
ये रे ये रे चे गाणे

पाऊस पडता बेडुक गाती
डराँव डराँवचे गाणे
वा-यावरती नाचत येते
थेंबाथेंबांचे गाणे

थेंब टपोरे धावत येती
सरसरसर गाती गाणे
अंगणात मग फेर धरुनी
आम्हीही गातो गाणे

पावसात भिजताना गाऊ
गोड पावसाचे गाणे
हिरवी हिरवी होती शेते
कणसांचे गाती गाणे.......

गुलमोहर: 

.

गोड गोड पावसाचे गाणे........ Happy

गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
यावरुन लहानपणी गायलेल्या बालगितांची आठवण झाली....... Happy

पाऊस कोसळतो आहे. आणि हे पावसाचे गाणे म्हणत गोल फिरावस वाटत आहे.
मस्त कविता.

नेहमी प्रमाणेच आवडल..:)
या गोड पावसाच्या गाण्याच्या गोडीने (ओढीने) तरी पाऊस नक्कीच येऊन त्याचा back log भरुन काढेल.