ओ बाजीराव....(मुलगा व्हर्जन)

Submitted by पुरंदरे शशांक on 17 July, 2012 - 00:43

ओ बाजीराव....

टकामका टकामका
बघता काय राव
चळवळ ती कित्ती कित्ती
ओ बाजीराव

काळेभोर डोळे छान
तरतरीत नाक
जरा उभा र्‍हाउं दे
म्हणाल जॅकी श्रॉफ

बोळक्यातून हस्ता कसे
ओ टकलूभाय
उडतील जेव्हा झुल्पे
तेव्हा फुल स्मार्ट गाय.....

("गोब-या गोब-या गालाची" हे बडबडगीत वाचून अनेक मॉम्स नी मुलगा व्हर्जन मागितले - ते हे - 'बडबडगीत' - जमलंय का जरुर सांगा..... मागणी वाढल्यामुळे जरा फाष्टंम फाष्टंम करावं लागलं .......)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्स ::)

ते एक जैकीश्रॉफ आणि टकलु हे दोन उल्लेख सोडले तर झेपेल...म्हंजे आमच्याकडे जावळाची कमी नाह म्हणून फक्त ते लागू होत नाही Happy
खास प्रयत्न केल्याबद्द्ल पुन्हा एकदा आभार Happy

बोळक्यातून हस्ता कसे
ओ टकलूभाय
उडतील जेव्हा झुल्पे
तेव्हा फुल स्मार्ट गाय..... Lol

मस्त आहे Happy

शशांक, विशेष प्रयत्नांबद्दल आभार.
आमचे बाजीराव बोळक्याच्या बरेच पुढे गेले आहेत. उलट आता बोळकं कधी होणार म्हणून आम्ही वाट बघतोय. अजून एकही दात हलायचं नाव घेत नाहीये Lol

"बोळक्यातून हस्ता कसे
ओ टकलूभाय
उडतील जेव्हा झुल्पे
तेव्हा फुल स्मार्ट गाय..... "

व्वा खूप छान!