गद्यलेखन

सुगंधा - भाग १

Submitted by कविता१९७८ on 6 April, 2015 - 07:28

==============================================================================

कथा लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ , कथा आवडेल आणि काही चुका आणि त्रुटी असल्यास तुम्ही निदर्शनास आणुन द्याल अशी आशा करते.

============================================================================

"तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघच्या कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. तिला विसरणे खरंच इतके अवघड होते? का? ती जेव्हा आपल्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपण जगत नव्हतो तिच्या आधी आपल्या आयुष्यात कुणी दुसरी होती असेही

शब्दखुणा: 

हलकासा धक्का जोरसे लगे

Submitted by सुनिल परचुरे on 3 April, 2015 - 03:23

खरेतर हि जुनि कथा आहे. पण १ एप्रिल चि आठवण करुन देणारि म्हणुन परत सादर करत आहे. तसा ऊशिरच झला आहे.तरि पण.......

हलकासा धक्का जोरसे लगे

``रावसाहेब, आंत येऊ कां ?``
``कोण ? तुकाराम , आणि हे कोण बरोबर ?``
``रावसाहेब , गेल्या चार दिवसापासून ह्ये म्हातारे आजोबा रोज येतायत. आज बी सकाळपासून त्यांनी काय बी खाल्ल नाही. त्यांच एवढ जमिनिची काय काम आहे ते करुन टाका की ?``

शब्दखुणा: 

तलखी

Submitted by बाळू पॅराजंपे on 2 April, 2015 - 14:08

चावडीसमोर बोकडाला हार घालून उभं केलं होतं. चहुकडून वाद्यं वाजल्यानं बोकड अस्वस्थ झाला होता. पण त्याला दोन चार दणकट पोरांनी जखडून टाकला होता. चावडीत देव होते. देवापुढं नारळ फोडून झाला, गुलाल उधळायला सुरूवात झाली आणि पारूबाईच्या अंगात आलं.

ती घुमू लागली.

अस्खलित हिंदीत ती गुरगुरल्यासारख्या आवाजात बोलू लागली. गंग्याच्या चवचाल बायकोवर, नूतन वर, सगळ्यांचाच डोळा. तिचे केस धरून पारूबाई तिला शिव्याशाप देऊ लागली.

छिनाल , छिनाल है तू, बोल सच या झूठ !

शब्दखुणा: 

अनाथ

Submitted by मोहना on 1 April, 2015 - 19:27

"मग टाकायचं होतं अनाथ आश्रमात. कुणी सांगितलं होतं आम्हाला सांभाळा म्हणून?" नखाइतकी असल्यापासून सांभाळलेल्या आपल्या पुतण्यांकडे बयोकाकू डोळ्यातलं पाणी जिरवीत पहात राहिल्या. बापू हातातल्या काठीवर जोर देत थरथरत तोल सावरीत उभे राहिले,

शब्दखुणा: 

गुंतवळ.....जी.ए.कुलकर्णी

Submitted by अशोक. on 1 April, 2015 - 04:45

जी.ए.कुलकर्णी...एक असे नाव जे घेताच मराठी वाचकाच्या मनात त्यांच्या कथालेखनाविषयीची कल्लोळ आकार घेऊ लागतो. योजनारहित जीवनातील सर्वव्यापी सूत्रहीनता आणि ललाटी आलेले पण परिस्थितीनुसार ते उघड्या डोळ्यांना कधीच न दिसणारे, दिसेल तेव्हाच त्याचे परिणाम पदरी पडल्यावरच अशी अव्याहतपणे भेटत जाणारी पात्रे. चारचौघातीलच आणि तशीच आहेत ती वरवर पण विलगतेच्या ज्या अनेक पातळ्या आहेत त्यात जी.ए.त्याना शोधत असतात.

शब्दखुणा: 

Thank God..! Finally...

Submitted by मी मुक्ता.. on 1 April, 2015 - 04:18

कालच सर्फ ची एक जाहिरात बघण्यात आली. (जाहिरातीचे काही डिटेल्स चुकले असले तर सॉरी. नेट वर मिळत नाहीये मला ती अ‍ॅड..) दोन म्हातार्‍या बायका चहा घेत गप्पा मारत असतात, "आमच्यावेळी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा ६ रुपये पगार होता. आणि आज माझी सून माझ्या मुलापेक्षा जास्त कमवते. किसने सोचा था औरते इतना आगे चली जाएंगी? आजके जमानेमेंही औरत बनने का मजा है.." मागे सून लॅपटॉपवर काम करत असते.

शब्दखुणा: 

एक प्रमुख पाहुणा

Submitted by सुशांत खुरसाले on 30 March, 2015 - 00:40

कॉलेज सुटलं आणि आम्ही तिघे मित्र घरी जाण्यासाठी निघालो. शेजारच्या रस्त्यावरून आमचेच काही मित्र त्यांच्या मैत्रिणींना घेऊन इमानेइतबारे घरापर्यंत सोडण्यासाठी गाडीवर निघाले होते.(या मैत्रिणी वर्गात आपल्या वाटत असल्या तरी गाडीवर बसल्यावर पूर्णपणे 'त्यांच्या' होतात.)
आपल्याला हे काम कधीही जमणार नाही अशी आमची गाढ श्रध्दा आहे- कारण आम्ही जाताना एवढे धिंगाणे करत जातो की स्वतःच्याच घरापर्यंत सहीसलामत पोचण्याची हमी नसते.

अबोल प्रेम

Submitted by अभिजित चोथे on 28 March, 2015 - 11:11

नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाल्याने आकाश धावतच कॉलेज गेट वर आला. कॉलेज सुटले नाही हे पाहून त्याने हुष्य केले. तो घामाने पूर्ण भिजला होता. चेहर्यावरील घामाच्या धारा लांबूनही सहज दिसत होत्या. विस्कटलेले केस, प्यांटमधून निम्मा बाहेर आलेला शर्ट आणि पळण्याच्या नादात बंद तुटलेली स्य़क घेऊन झाडाच्या सावलीत जिथे तो नेहमी उभा राहतो तिथे जाऊन उभा राहिला. दम लागल्याने अजूनही त्याची छाती वर खाली होत होती.

शब्दखुणा: 

नजरेची भाषा

Submitted by CutePari on 28 March, 2015 - 06:33

सहजच बोलता बोलता भाषेचा विषय निघाला कि आपले म्हणणे प्रभावी पणे मांडण्यासाठी कि भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी भाषा कोणती? कोणी म्हणे मराठी कारण शब्द पटकन सापडतात बोलायला कोणी म्हणे इंग्रजी का तर कमीत कमी वाक्यात समजवता येत म्हणून (इंग्रजी मध्ये कमीत कमी शब्दात किंवा वाक्यात कस समजावता येत असेल हे मलाही माहित नाही) या मुद्यावर बराच वेळ वादविवाद झाला पण कोणाचाच मत मनाला पटल नाही. कारण कोणत्याही भाषेमध्ये बोला पण एक गोष्ट नक्की कि बोलायच्या अगोदर शब्दाची जुळवाजुळव करावीच लागते. मग प्रभावी भाषा कोणती हे कस कळणार?

जोश्या

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

"जोश्या, काय रे कसा आहेस?"
- सोन्या मी ठिक आहे की तु काय म्हणतोस? जेवलीस काय? काय केलं आज कमल नं?

शनीवार/रविवारी हा ठरलेला संवाद, माझ्यात आणि माझ्या वडलांच्यात Proud
धक्का बसला का? अहो माझ्या वडलांना सगळे जोश्याच म्हणतात. मग मी कसं काय म्हणणार नाही? लाजे काजेस्तव कधी तरी अहो बाबा म्हणते. म्हणजे तसं अलिकडे अहो जाहो च करते, पण मध्यंतरी बरीच वर्ष कधी मी अहो म्हणालेच नाही त्यांना.. कायम 'अरे जोश्या'च.. कधी चुकून अहो जाहो म्हटलंच तर 'रागवलीस काय पद्मे?" अस प्रश्न यायचा...

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन