बागेश्री

उंदिरायण

Submitted by वेणू on 16 April, 2018 - 23:59

आमच्या घरात एक उंदीर शिरला. तो फारच Happy- Go- Lucky स्वभावाचा होता. आनंदाने चूं चूं असे गाणे गात तो घरभर हिंडायचा. खेळायचा. खाऊन पिऊन सुखी रहायचा. लपाछपी हा त्याचा अत्यंत आवडीचा खेळ. त्याच्या दृष्टीला बहुधा प्रकाशाचा त्रास होता. दिवसापेक्षा रात्री तो अधिक चपळ वावरू शकायचा. आधी तो फार धीट नव्हता. पण आमच्या घरातली माणसं कनवाळू आहेत हे त्यालाही पटले आणि तो आम्हाला वॉशिंग मशिनच्या खालून ते सोफ्याच्या सांधीत असे धावून दाखवू लागला. तो बहूधा अटेंशन सीकर सुद्धा असावा. कारण "अले, लब्वॉड किती चान पलतो ले" असे आम्ही कुणीच कौतुक न केल्याचा राग, तो सोफा इत्यादि कुरतडून व्यक्त करायचा.

शब्दखुणा: 

लाडकी बाहुली

Submitted by वेणू on 20 May, 2016 - 01:06

मी फार लहान असताना, माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान होता.
पण मग मी ताई असल्याने, मी लहानपणीही मोठी होते... ही त्या दिवसांची गोष्ट!!

'आई' तुझंही आता रुप बदलतंय...!!

Submitted by बागेश्री on 28 May, 2012 - 08:20

कवडश्यांनी सजवलेली मैफिल,
तुझ्या घरात डोकावणार्‍या निसर्गाचं लक्षण होतं...

सूर्यकिरणांच्या त्या तिरिपेने वाहून आणलेल्या धूळीच्या कणांची रांग मोडण्याचा,
लाडका खेळ खेळण्यात घरातलं इवलं पाऊल अगदी रमून जायचं...
त्या इवल्या हातांनी कवडसे गच्च धरल्याच्या आनंदात,
घराला, कित्येकदा गोंडस हसण्याने न्हाऊ घातलं

पण महत्त्वाकांक्षांना तरलता उमजते का?

अंगणातली माती, त्या रांगणार्‍या गुडघ्यांनी घुसळून निघाली..
त्याच गुड्घ्यांना हलक्या हाताने खोबर्‍याचे तेल लावतांना, डोळे पाणावले तुझे!
तुझं पाणी पाहून कावरं बावरं ते, अजूनच बिलगत असे तुला..
ती वेडी भाषा तुलाच कळत असे..

गुलमोहर: 

असेच काही, अवती- भवती...!

Submitted by बागेश्री on 26 April, 2012 - 04:00

अपयश झेलण्यासाठी
काही क्षण पुरतात, पण पेलण्यासाठी मात्र
सबंध आयुष्य!

महत्वाकांक्षांचे अपयश एकवेळ
पचतेही, पण नात्यांनी कच खाल्ली, की
सावरणारे हातच दुबळे पडतात...

तिथे 'आपलं' काही उरत नाही
'तुझं-माझं' नावाचा एक विचित्र प्रवास सुरू होतो!
आणि हळूहळू, वाटाच निर्णय घेऊन टाकतात,
विरुद्ध निघून जाण्याचा!
दोन प्रवासी- वेगळ्या वाटा, हुरहूर मात्र आत जपलेली..

ही खाल्लेली कच, रुतणारा सल
आणि लागलेली हुरहूर, मनात घर करून राहते,
नि त्या घरावर अपयशाचा झेंडा!!

आता स्वतःला समजवण्याचे अनेक नवे मार्ग, नवी कारणे, समर्थनाचे लाखो उपाय!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बागेश्री