काव्यलेखन

खेळ मांडीयला...

Submitted by सांज मन on 13 February, 2014 - 00:34

खेळ मांडीयला...
खेळ मांडीयला
पण खेळलाच नाही
डाव पहिला होता
पण सरलाच नाही …

खेळ मांडीयला
कुणी पहिलाच नाही
मातीत घाम ,
कुणी पुरलाच नाही …

खेळ मांडीयला
कुणी भापलाच नाही
भरला होता श्वास
पण कुणी दमलाच नाही …

खेळ मांडीयला
पण कळलाच नाही
शेवट ठरलाच होता
सुरवातीला उमगलाच नाही …

खेळ मांडीयला
पण थांबलाच नाही
खेळ सरला
जीव उरलाच नाही
- सारंग

शब्दखुणा: 

क़तील शिफ़ाई (अनुवाद )

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 February, 2014 - 12:21

क़तील शिफ़ाई (अनुवाद )

वेदनांनी झोळी माझी सारी भरू दे रे अल्लाह
मग हवे तर मज पूर्ण वेडा होवू दे रे अल्लाह

चंद्र कधी तारे तुज मी सांग मागितले होते
स्वच्छ हृदय सचेत नजर तू दे रे अल्लाह

सूर्या सारखी वस्तू तर कधीच आम्ही पाहिली
आता खरोखरची एक प्रभात पाहू दे रे अल्लाह

या धरतीच्या जखमा वर लाव दवा काही
वा माझे हृद्य हे पत्थर होवू दे रे अल्लाह

क़तील शिफ़ाई

रुपांतर - विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाले येथे जगून मी आयुष्या

Submitted by जयदीप. on 12 February, 2014 - 11:47

माझे माझ्यात चालते घुटमळणे
माझे माझ्यात राहते घुसमटणे

आता खेळू नको असे माझ्याशी
माझे बघवेल का तुला तडफडणे?

माझे सोडून दे अता माझ्यावर
सरले माझे तुझ्यामधे गुरफटणे

तू सांग मला अता कुठे आहे मी
माझे माझ्यातच असते भरकटणे

झाले येथे जगून मी आयुष्या
काय मला घाव काय ते भळभळणे

तू दिसल्यावर पुन्हा सुरु होणारच
शब्दांचेही अधेमधे अडखळणे

-जयदीप

माळ मित्र आणि मैत्रिणीची

Submitted by prayaga on 12 February, 2014 - 07:58

खूप वर्षांनी एक छोटासा प्रयत्न केला. मनात बराच गोंधळ मजला होता कोणाला सांगावस ते कळे ना म्हणून हा खटाटोप .

लोकशाही

Submitted by मयुरेश साने on 12 February, 2014 - 02:12

निवडून देत होतो की देश विकत होतो
ते खोल खणत होते मी टोल भरत होतो

मतदार आजचा का नथुराम होत नाही
बेकार बंदुकीचा मी चाप धरत होतो

छप्पर कुटुंब कपडे आणी पगार व्हावा
शाळेत जीवनाच्या इतकेच शिकत होतो

दगडात राहुनी तू करतोस काय देवा
झाल्या तुझ्या चुकांचा मी भोग ठरत होतो

केव्हातरी मलाही पावेल लोकशाही
ते रोज चरत होते मी धीर धरत होतो

...मयुरेश साने

आयुष्या...!

Submitted by अनिल आठलेकर on 11 February, 2014 - 14:27


अपेक्षा,मोह,आकांक्षा उराशी फार आयुष्या,
तुझा सोडून दे आता बुळा निर्धार आयुष्या..!

जशी येते तशी जाते तुझी चाहूल माघारी,
कुणाची ताबिली आहे अशी लाचार आयुष्या..?

नको देऊ तुझ्या साक्षी नवे आरोप होताना,
मला चालेल शिक्षाही तुझी गद्दार आयुष्या..!

नको लालूच सौख्याची उगा तू दाखवू आता
व्यथा मी ठेवतो मागे मनी गर्भार आयुष्या...!

मिळाली दुश्मनी येथे जिवाला जीव देणारी,
कळाले चेहरा खोटा खरा व्यवहार आयुष्या..!

~ अनिल आठलेकर,
11/02/2014

मन रे

Submitted by अज्ञात on 11 February, 2014 - 08:56

मन रे धाव रोखुनी घे
सरती मागे सोस वयाचे
निजलेले ना अजुनी जागे
रोज सकाळी सायंकाळी
काळ सरकतो मागे
मन रे धाव रोखुनी घे…….

असलेले ओंजळीतले जग
श्वास तयास लगडलेले बघ
घे पिउनी अमृत भरलेले
ते जितके तितकेच पुरेसे
जगण्या अधिक न लागे
मन रे धाव रोखुनी घे…….

मरण अखेरी शून्य सोबती
झुळुक वादळे येती जाती
वातीविण तेवे ना पणती
धर छाया कळवळते ज्योती
व्यर्थ मानवी दंगे
मन रे धाव रोखुनी घे…….

……………. अज्ञात

तुझ्यासारखे वाचता येत नाही

Submitted by जयदीप. on 11 February, 2014 - 06:31

तुझ्यासारखे वाचता येत नाही
मला माणसा परखता येत नाही

तुझ्यासारखी सहजता येत नाही
मला नेमके बोलता येत नाही

नको आज आणूस डोळ्यात पाणी
मला आजही पोहता येत नाही

तुझा राहुदे हात हातात माझ्या
मला एकटे चालता येत नाही

तुला सांगतो चेहरा दु:ख माझे
तुझ्यासारखे लपवता येत नाही

तुला भेटतो अन् मला तेच होते...
मला भानही ठेवता येत नाही!

जरी लागतो रोज जयदीप माझा
तुझ्यासारखे तेवता येत नाही

-जयदीप

नवा शेर:

मला देवपण काहिही देत नाही
तुझ्यासारखे मागता येत नाही

वाट चुकलंय माझं गाव!

Submitted by मुग्धमानसी on 11 February, 2014 - 05:20

कैच्याकै उगाचच.... काहिसुद्धा कारण नाही!
आत्ता तर खिडकीबाहेर जरासुद्धा पाऊस नाही!
मस्त कोवळं पडलंय उन,
तेही उबदार खिडकीतून...
तुकड्या तुकड्यात हलतंय पान
काही नवं, बरंच जून...
दूर दूर सुद्धा कुणी आर्त वगैरे आळवत नाही
उगीच जवळ बसून कुणी हळवं-बिळवं बोलत नाही
तरिसुद्धा कहितरी
बिनसलेलं आहे राव
कळत नाही नक्की कुठे
वाट चुकलंय माझं गाव!

किबॉर्डाच्या कडकडाटात गहिवरून काय येतंय...
एसीहूनही गार माझं, मन निपचित होऊन जातंय...
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय
हे काही खरं नाही
असं होणं बरं नाही
गूढ डोह असेन मी पण
पाणवठ्याचं तळं नाही!

शब्दखुणा: 

सकाळ

Submitted by समीर चव्हाण on 11 February, 2014 - 03:54

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन