काव्यलेखन

"नक्षत्र"

Submitted by poojas on 4 February, 2014 - 02:17

संपलेच केव्हा सारे निघताना कळले होते
मी तुझ्याच शब्दाखातर माघारी वळले होते..

तू म्हणता 'थांब जराशी', चुकला ह्रदयाचा ठोका
जे उरी गोठले अश्रू, तत्क्षणी वितळले होते..

अक्षम्य चुकांचा तेव्हा, मी हिशोब मागू म्हटले
जे गैर समजले गेले, थोडके निवळले होते..

होती जगण्याची बाकी, टळलेल्या काही वेळा
जे विझले होते स्वप्नी, ते दिवे उजळले होते..

वळण्याची टळली वेळ, कळली जगण्याची भाषा
वेगळे न होऊं शकले, ते रंग मिसळले होते..

तू म्हटले विसरू सारे, सुरुवात करु सार्‍याची
भरगच्च नभातून तेव्हा, नक्षत्र निखळले होते ।।

poojaS..

शब्दखुणा: 

कुठे साधतो देव तरी संवाद कुणाशी ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 February, 2014 - 01:49

घेणे-देणे ना कोण्या ऐ-या गै-याशी
अतूट राहो दु:खाचा संबंध घराशी !

चंद्राच्या कोरीला बसते न्याहाळत मी
कुठे सामना होतो हल्ली असा तुझ्याशी

दुराव्यातल्या कैफाबद्दल विचारू नका
विचारात त्याच्या सरती दु:खांच्या राशी

तसे पाहता शांत वाटतो तो वरकरणी
खळबळ सगळी दडपत असतो डोह तळाशी !

नकोस होऊ हिरमुसली तू अबोल्यामुळे
कुठे साधतो देव तरी संवाद कुणाशी ?

थंडी, वारा, पावसातही तटस्थ असते
हेलाउन जाते प्रेमाची झुळुक जराशी !

'आयुष्याचा तिढा उकलणे अवघड असते'
इतकी सोपी बांध 'प्रिया' खुणगाठ मनाशी !

-सुप्रिया.

जात्यावरची पहाट

Submitted by संतोष वाटपाडे on 3 February, 2014 - 22:23

रामपहारी पुढल्या दारी
पडवीमध्ये विसावलेल्या
आमच्या दगडी जात्यावरती
गहू बाजरी उडिद नाचणी
आईसोबत दळण्यासाठी
म्हातारीच्या जुनाट ओव्या
पदरामध्ये मिळण्यासाठी
गल्लीमधल्या गावामधल्या
शिकलेल्यांच्या शेतकर्‍यांच्या
अनेक बाया जमा व्हायच्या...

लाजत मुरडत गालामध्ये
दळता दळता घेत उखाणे
एकेकीच्या दळणासोबत
ननंद जाऊ नवर्‍याचीही
बरीच चेष्टा गाण्यांमधुनी
सासूची अन नक्कलसुद्धा
अगदी खर्‍याच आवाजाने
काळ्या चहात समरसताना
दातावरती मंजन काळे
हळूच काही लावायाच्या...

शेणपटाने सारवलेल्या
मळक्या पाटीमध्ये मोठ्या
विस्कटलेले पीठ ओतूनी
त्यावर नक्षी कशाकशाची
राम कृष्ण या नावांचीही

भिजलो होतो मी तेव्हा

Submitted by जयदीप. on 3 February, 2014 - 09:08

भिजलो होतो मी तेव्हा
रडलो होतो मी तेव्हा

कोणी आले नाहि तुझे
झिजलो होतो मी तेव्हा

हसले होते नशिब जरा
फसलो होतो मी तेव्हा...

नव्हते दडपण वा चिंता
हरलो होतो मी तेव्हा

झाला होता स्पर्श तुझा....
घडलो होतो मी तेव्हा....

-जयदीप
९८.१९७९.१०.२३

डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या मित्रांनी व्ही, आर . एस .घेतली तेव्हा..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 February, 2014 - 06:49

डॉ .वाघमारे आणि डॉ.साळी या डॉ न मित्रांनी आज व्ही, आर . एस .घेतली
त्या निमित्ताने

डॉ. साळी
माझ्या जीवन रसिक मित्रा
जवळ जवळ १२ वर्ष झाली
आपल्या पहिल्या भेटीला
तेव्हा तू मला वाचवले होते
उगाचच सणककेल्या
बॉसच्या तावडीतून
कामाच्या पहिल्याच दिवशी...
तेव्हापासून
तुझा प्रत्येक सल्ला
मला वाचवत होता
मार्ग दाखवत होता
सहज बोलता बोलता
मला खूप काही देत होता
या जीवनात अनेक लोक भेटले
त्याच्या जगण्याचे
अनेक स्तर होते काही वरवरचे उथळ
काही खाना पिना मजा करना या पंथाचे
तर काही मध्यम
घरादाराच्या चाकोरीत गरगर फिरणारे
तर काही खोलवर

तमातून तमाकडे….

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 February, 2014 - 06:43

तमातून निघे
तमाकडे गाडे
प्रकाश तुकडे
पांघरुनी ||१
जगण्याचा भार
शीर्ण मनावर
सर्वांगी नकार
दाटलेला ||२
होते अगोदर
काय ते नंतर
भयाने अंतर
काजळले ||३
फुटक्या प्रार्थना
अतृप्त याचना
सजवुनी मना
निरर्थक ||४
असेल देहांत
जगताचा अंत
अजीर्ण वेदांत
होत असे ||५
विक्रांत प्रभाकर http://kavitesathikavita.blogspot.in/

एका कवेत चंद्र...

Submitted by मंदार शिंदे on 2 February, 2014 - 19:56

एका कवेत चंद्र अन्‌ दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती

तो चंद्र दाखवी स्वप्ने, भलतीच भलतीसलती
मग चंद्रावर पांघरली, मी भाकरीची चादर होती

झोपेला गाई अंगाई, मी असाच निद्रानाशी
स्वप्नांच्या दुनियेलाही, मारली मी ठोकर होती

त्या चांदण्यांच्या गप्पा, अन्‌ पौर्णिमेची स्वप्ने
या फाटक्या संसाराला, आशेची झालर होती

एका कवेत चंद्र अन्‌ दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती

आठवण

Submitted by संजयb on 2 February, 2014 - 14:17

स्वप्न ते न राहीले
मंदसा गंध फक्त
गुलाब फूल न राहीले
आता ऊरले जूझे भास
स्पर्श नाहीं राहीले
डोळ्यातील प्रकाश तूझ्य
मावळतीत मिसाळला
रात्रीचे चांदणे मज दाह देऊ लागले
तू ओलांडलीस सीमा
अन् मी बद्ध जाहलो
ओळखीच प्रत्येक गीत
आता विरह गीत जाहले

शब्दखुणा: 

अमेठीची शेती

Submitted by अभय आर्वीकर on 2 February, 2014 - 13:46

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

मंगळसूत्र तुटता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 2 February, 2014 - 11:58

सगळीच सूत्रे होती तुटली
नाती विटून विरून गेली
मंगळसूत्र पण तुटता अचानक
कावरीबावरी ती होती झाली
क्वचित हाती तिने घेतला
नोझल स्पँनर शोधून काढला
खटपट करून कडी निसटली
जोडण्याचा अन यत्न केला
अश्या कामात धावणारा तो
लांबून फक्त पाहत होता
आता जोडाजोडी करण्यात
त्याला मुळी इंटरेस्ट नव्हता
प्रयत्नांती ते नच जुळले
वैतागून मग वदली ती
सोंगढोंग या जगासाठी
उगा करावी लागती ही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन