लोकशाही

Submitted by मयुरेश साने on 12 February, 2014 - 02:12

निवडून देत होतो की देश विकत होतो
ते खोल खणत होते मी टोल भरत होतो

मतदार आजचा का नथुराम होत नाही
बेकार बंदुकीचा मी चाप धरत होतो

छप्पर कुटुंब कपडे आणी पगार व्हावा
शाळेत जीवनाच्या इतकेच शिकत होतो

दगडात राहुनी तू करतोस काय देवा
झाल्या तुझ्या चुकांचा मी भोग ठरत होतो

केव्हातरी मलाही पावेल लोकशाही
ते रोज चरत होते मी धीर धरत होतो

...मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतदार आजचा का नथुराम होत नाही
बेकार बंदुकीचा मी चाप धरत होतो

मोदी निवडून येइस्तवर पहिली ओळ लिहू नका. नि तो दुसरा कोण गांधी आला तर ताबडतोब ही ओळ पुसून टाका.
नाहीतर तो तुम्हाला अतिरेकी म्हणून तुम्हाला अटकेत टाकण्यासाठी चिनी पाकीस्तानी कंपनीला एक हजार कोटी रुपयांचे काँट्रॅक्ट देईल. शिवाय इथले लोक म्हणतील, बेशरमीकी भी कोई हद होती है!!

नि बंदुकीचा चाप धरण्याची नि वापरण्याची चांगली सवय करा. आजकाल भर लोकसभेत, पेपर स्प्रे नि सुरे वापरून "वादविवाद" होतात. तेंव्हा बंदूक येणे हे लोकसभेत निवडून येण्यासाठी आवश्यक होईल लवकरच.

चांगले प्रतत्न केलेस सगळ्या शेरात मला आवडले प्रत्येकातच काहिन्काही खास केलय्स तू ..म्हणजे तुला ते जमलय !
सर्वात जास्त आवडला शेवटचा

ह्यातून तुम्हाला काय सुचित करायचे आहे

परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की अगदी निंदनीय कृत्यांचाहि आसरा घ्यावासा वाटतो. हताशेची परिसीमा.

अर्थात तो कुठला गांधी निवडून आला की सगळे एकदम ठीकठाक होईलच असे तुम्हाला माहित आहे ना? मग तुम्ही कशाला काळजी करता? इकडे पाकीस्तानी लोक भारतात घुसले तरी तो प्रथम या कवींना अटक करेल नि अमेरिकन लोकांना सांगेल की पाकीस्तानी लोकांपेक्षा मला भारतीय हिंदूंचे भय अधिक वाटते.

दगडात राहुनी तू करतोस काय देवा
झाल्या तुझ्या चुकांचा मी भोग ठरत होतो

केव्हातरी मलाही पावेल लोकशाही
ते रोज चरत होते मी धीर धरत होतो<<< मार्मिक