तुझ्या सवे फीरताना
झाले उन्हाचे चांदणे
तनमनाचे अद्वैत
नाही काही देणे-घेणे
कधी बसावे रुसुन
कधी बोलावे हसुन
सागराचे चंद्रासाठी
पुन्हा भरतीचे येणे
कधी वाटले तुटले
सारे सर्वस्व लुटले
पण धागे रेशमाचे
भक्कम ताणे बाणे
एकच दिवस प्रेमाचा?
एक गुलाब देण्याचा?
हा जन्माचा उत्सव
साता जन्माचे हे लेणे
पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011
त्या बोटॅनिकल गार्डन मधे, सगळीकडे फूलझाडे विखुरलेली आहेत. गुलाबाची झाडेही तशीच. पण एका ठिकाणी मात्र त्यांचा अप्रतिम संग्रह आहे.
त्यांची लागवड पण अत्यंत कलात्मकतेने केलेली आहे. त्यांचे विभाग आहेत ते रंगानुसार. म्हणजे एका विभागात एकाच रंगाच्या गुलाबांची झाडे. मग त्यात पाकळ्यांच्या वेगवेगळ्या रचना, आकार आणि संख्या. त्यातल्या पायवाटाही अशा रचल्या आहेत, कि प्रत्येक फूलाचे निरिक्षण करता यावे.
या गोड प्राजक्ताशी उन्मुक्त वात वाहे
सोडून भान सारे ती त्याचीच वाट पाहे ॥
गाली गुलाब फुलले ओठात गीत आहे
का लाजते रति ग तू त्याची प्रियाच आहे ॥
डोळ्यातल्या स्वप्नांचा मनीही गाज आहे
तुझीच साथ द्याया चंद्र चंद्रिका आज आहे ॥
या शीतल चांदराती तेवती तू वात आहे
भरेल ओंजळी ज्याची प्रकाशे तो त्याचाच हात आहे ॥
शांत नदीचा किनारा का ग खळाळत आहे
कि तुझिया मनाची हुरहूर तो दाखवीत आहे? ॥
सांभाळ मदनिके ग चाहूल त्याचीच आहे
स्वप्नांना रंग द्याया आजची हि रात आहे ॥
गुलाबांच्या फूलांचे मला लहानपणापासून आकर्षण आहे. मालाडला आमच्या घरी अनेक प्रकारचे गुलाब जोपारले होते. पण पुढे काही बांधकाम झाल्याने ते टिकले नाहीत.
अंधेरीला भवन्स कॉलेजच्या आवारात मी पहिल्यांदा मोठी गुलाबाची बाग बघितली. नंतर बघितली ती, वरळीला नेहरु सेंटरच्या समोर. आधी तिथे मोठी गुलाबाची बाग होती. पण आता ती नष्ट झालीय. तिथे आता एक बाग आहे पण बागेत गुलाबाची झाडे नाहीत.
बसनं इंदौर सोडलं आणि माझी झोप उडाली. ३० सीटर बसमध्ये २७ नंबरच्या सीटवर बसलेल्या आणि म. प्र. मधील रस्त्यांवर चालणाऱ्या बसमध्ये माणसाची परिस्थिती व्हॉलीबॉलसारखीच होते. मी अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्या घालत, हा व्हॉलिबॉलचा खेळ कधी संपतो, याची वाट पाहत होतो. शरीराने जरी मी बसमध्ये असलो तरी मनाने कधीचाच अमरावतीला पोहचलो होतो.