ऑकलंड भाग ४ - बोटॅनिकल गार्डन - फक्त गुलाब

Submitted by दिनेश. on 27 January, 2011 - 15:45

पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011

त्या बोटॅनिकल गार्डन मधे, सगळीकडे फूलझाडे विखुरलेली आहेत. गुलाबाची झाडेही तशीच. पण एका ठिकाणी मात्र त्यांचा अप्रतिम संग्रह आहे.

त्यांची लागवड पण अत्यंत कलात्मकतेने केलेली आहे. त्यांचे विभाग आहेत ते रंगानुसार. म्हणजे एका विभागात एकाच रंगाच्या गुलाबांची झाडे. मग त्यात पाकळ्यांच्या वेगवेगळ्या रचना, आकार आणि संख्या. त्यातल्या पायवाटाही अशा रचल्या आहेत, कि प्रत्येक फूलाचे निरिक्षण करता यावे.

बहुतेक सर्व झाडे, नुसती फूलांनी बहरलेली. (म्हणजे मी वेळ चांगली साधली होती तर.) माझ्यासाठी तरी तो चक्रव्य़ूहच होता. कुठून सुरवात करायची आणि कुठे थांबायचे तेच कळेना. हावरटासारखे फोटो काढत होतो. एकाच फूलाजवळ परत आलो, तरी कळायचे नाही.

साधारणपणे तिथल्या गुलाबांना सुगंध नव्हता. पण एक झाड खास सुगंधी फूलाचे होते. लौकीक अर्थाने ते फूल सुंदर नव्हते पण सुगंध म्हणजे थेट इसेन्सची बाटली, फ़ोडावी असा.

निळ्या रंगाचे गुलाब निर्माण करायचे प्रयत्न जगभर होतच असतात, तिथे काही जांभळ्या रंगाचे गुलाबपण दिसले. पण त्या मानाने दुरंगी गुलाब, कमीच दिसले.

मी काही तिथे, फूलांचा दुष्काळ असलेल्या भागातून गेलो नव्हतो, तरी पण..

मला या फूलांची निवड करणे, खूपच कठीण गेले. नेहमीचा घाट्दार आकार वगळून काहि वेगळे प्रकार दाखवायचा प्रयत्न करतो. तरी मी इथे, ताकापूना मधल्या, गुलाबांचे फोटो टाकत नाहिय्ये..

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

२५.

२६.


२७.

२८.

२९.

३०.

३१.

३२.

३३.

३४.

३५.

३६.

३७.

३८.

३९.

४०.

४१.

४२.

४३.

४४.

४५.

४६.

४७.

४८.

४९.

५०.

५१.

५२.

५३.

५४.

५५.

५६.

५७.

५८.

५९.

६०.

६१.

६२.

६३.

६४.

६५.

६६.

६७.

६८.

आता पुढच्या भागात, इतर फूले..

गुलमोहर: 

काय सुरेख आहेत गुलाब. कित्येक नवीन रंग पहायला मिळाले. ३९ तर मस्तच.

गुलाबी रंग म्हणून गुलाब का गुलाबासारखा रंग म्हणून गुलाबी - इथल्या रंगांवरून तर दोन्ही नाही. नाही का? Happy

मेजवानीच आहे! ४५ आणि ५१ खूप आवडले (मात्र ते गुलाब वाटत नाहीयेत Happy ). देखणे परागकण ही खरेतर गुलाबाची मक्तेदारी नाही पण ह्यातले काही गुलाब त्यांच्या परागानीच लक्ष वेधून घेताहेत (२१, ३६). रंग तर अगदी हटके आहेत.

बोलायला काही शब्दच नाहीत माझ्याकडे.
निळे गुलाब ऐकले होते पण पहिलांदा पाहीले. खुप खुप खुप सुंदर.

काय भन्नाट गुलाब आहेत हे सगळे..... दिनेश तुम्ही खरेच नशिबवान तुम्हाला हे सगळे पाहायला मिळाले...

यामधला ५४ नंबरचा, सुगंधी होता.

श्री : आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी वेगळे गुलाब होते तिथे. एक संग्रह म्हणून सगळ्यांचे नमुने ठेवलेत इथे.
आर्च : सगळ्या संकल्पनाच मोडीत निघाल्या इथे.
मामी : आदल्या दिवशी ४ तास आणि दुसर्‍या दिवशी ५ तास, असे सलग भटकत होतो तिथे. प्रत्येक वळणावर काही तरी वेगळे होते तिथे.
मुक्ता, रोचीन, वर्षू : तूम्ही माझ्या अवस्थेची कल्पना करु शकाल.
माधव, जागू, सायली, साधना, नूतन : आपण सगळे तिथे जमू शकलो असतो तर.. असो पण हे माध्यम हाताशी आहेच की.

इतकी फूले बघितल्यावर ती तोडायचा / चोरायचा मोह कुणालाही होईलच कि नाही ? तिथल्या लोकांना पण होतो. तिथून झाडे चोरीला गेलीत म्हणून इथे छुपे कॅमेरे बसवले आहेत, असे फलकच होते तिथे...

दिनेशदा, फार फार धन्स. काय सुंदर फुल आहेत? एक से एक सुंदर. सगळेच छान आहेत. पण ७, ९, ३१, ३४, ३५, ३६, ४०, ४७, ५६, ६०, ६७ तर अप्रतिमच. लई आवडले.

दिनेशदा,
इतक्या प्रकारचे गुलाब पहिल्यांदाच पाहिले !
पण यातल्या काही फुलांवर एक प्रकारचा फिक्कटपणा दिसतो,आपल्याकडे खुप गडद रंग दिसतो !
Happy

अनिल, ते रंग, ते आकार आणि त्या छटादेखील, प्रयोगातून मिळवलेल्या आहेत. जगभर असे प्रयोग होतच असतात. नवनवीन आकार आणि रंग बघायला मिळतात. यातली सगळीच फूले काही टेबलावर ठेवण्यासाठी नसतात. टेबलावर ठेवण्यासाठी खास वेगळे रंग आणि आकार तयार केले जातात. त्यांची शेतीही होते. आपल्याला बाजारात नेहमी हेच प्रकार दिसतात. पण इथले प्रकार जरा वेगळे आहेत.

आणि देशादेशानुसार रंगांची आवड पण बदलते. आपल्याला चांगले वाटतात ते रंग युरपमधे भडक वाटू शकतात. आणि आपल्याला भडक वाटणारे रंग, आफ्रिकन लोकांना सोबर वाटू शकतात.

बाकीची फूले पण बघच. २ भागात आहेत.

आहाहा ! किती सुंदर रंग ! निसर्गाला सलाम आणि तुम्हाला धन्यवाद, हे सगळं चिकाटीने इथे टाकल्याबद्दल.
मला स्वतःला आतले पराग दिसण्याइतका उमललेला गुलाब आवडत नाही. पण २१ नं मधल्या परागांचा रंग कित्ती सुरेख आहे..थोडा पॅशन फ्लॉवरसारखा वाततो ना.

सुरेख रे, सर्व अप्रतिम. आज घरी जाताना बुके नेणार नक्की. बव्हेरिअन रोझेस ना एक खास सुगंध असतो.
त्या भागात एक गुलाब उत्सव करतात व सर्व वातावरण अगदी गुलाब सुगंधमय असते तेव्हा असे ऐकले आहे.
तसा हा गुलाबोत्सव Happy निवडक दहात.

अश्विनी, यापैकी १ सोडला (५४ ) तर बाकिच्या कुठल्याच फूलाला, अगदी मंद असाही सुगंध नव्हता. इतकी फूले आहेत म्हंटल्यावर, त्या परिसरात किती घमघमाट सुटायला हवा होता. तसे अजिबात नव्हते. या दिवसात तिथे उन्हाळा असूनही, असे नव्हते.

या उलट मस्कत मधे जिथे जी झाडे आहेत (बूच, बकुळ, गुलाब) त्यांचा सुगंध अगदी गाडीतही येत असे.

कुणाला पाठवू ते सांग ! >> Lol
मलाच द्या हो पाठवून.. मला इच्छा जरी झाली तरी पाठवणार वा देणार नाही इतके सुंदर आहे ते.. Happy