फूले

पुन्हा एकवार अंतरंग

Submitted by दिनेश. on 8 February, 2011 - 13:12

काय लिहू, अजून त्या स्वप्ननगरीतून बाहेर यावेसेच वाटत नाही.
शब्द संपले, वाक्य संपली...
डोळे मिटुनी बघावे....

एक स्वप्न असावे, जागेपणी बघता यावे.
एकातून दुसरे उलगडावे,
अवघे रंग एक व्हावे, त्या रंगात मी भिजावे
एकातून दुसरा, दुसर्‍यातून तिसरा
त्यातच सर्वाहून वेगळा, सगळ्यात असणारा
आणि नसणारा हि...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ऑकलंड भाग ५ - बोटॅनिकल गार्डन - इतर फूले (२)

Submitted by दिनेश. on 30 January, 2011 - 11:23

पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011
चौथा भाग इथे आहे, http://www.maayboli.com/node/23039
पाचव्या भागाचा पहिला भाग इथे आहे, http://www.maayboli.com/node/23131

संदर्भाच्या सोयीसाठी अनुक्रमांक पहिल्या भागापासून पुढे सुरु करतो.

गुलमोहर: 

ऑकलंड भाग ५ - बोटॅनिकल गार्डन - इतर फूले (१)

Submitted by दिनेश. on 30 January, 2011 - 10:46

पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950
तिसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/23011
चौथा भाग इथे आहे, http://www.maayboli.com/node/23039

फूलांचा राजा गुलाब, असे आपण आपले ठरवले आहे खरे पण त्यांच्या राज्यात सगळेच
राजे. कुरुप फूल अजून निर्माणच झाले नसावे.

त्या बागेत फ़िरताना, किती बघू, आणि किती फोटो काढू असे मला झाले होते. तशा
तिथे बहुतेक घरासभोवती बागा आहेतच आणि त्यात सुंदर सुंदर फूले आहेतच (काही
घरांच्या अंगणात तर फळे लगडलेली झाडे आहेत.) तरीपण या बागेतील फूले केवळ
अप्रतिम होती.

गुलमोहर: 

नैरोबीमधले गुलाब

Submitted by दिनेश. on 13 December, 2010 - 12:55

गुलाबांच्या फूलांचे मला लहानपणापासून आकर्षण आहे. मालाडला आमच्या घरी अनेक प्रकारचे गुलाब जोपारले होते. पण पुढे काही बांधकाम झाल्याने ते टिकले नाहीत.

अंधेरीला भवन्स कॉलेजच्या आवारात मी पहिल्यांदा मोठी गुलाबाची बाग बघितली. नंतर बघितली ती, वरळीला नेहरु सेंटरच्या समोर. आधी तिथे मोठी गुलाबाची बाग होती. पण आता ती नष्ट झालीय. तिथे आता एक बाग आहे पण बागेत गुलाबाची झाडे नाहीत.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - फूले