व्ही डे

Submitted by चाऊ on 13 February, 2011 - 09:33

तुझ्या सवे फीरताना
झाले उन्हाचे चांदणे
तनमनाचे अद्वैत
नाही काही देणे-घेणे

कधी बसावे रुसुन
कधी बोलावे हसुन
सागराचे चंद्रासाठी
पुन्हा भरतीचे येणे

कधी वाटले तुटले
सारे सर्वस्व लुटले
पण धागे रेशमाचे
भक्कम ताणे बाणे

एकच दिवस प्रेमाचा?
एक गुलाब देण्याचा?
हा जन्माचा उत्सव
साता जन्माचे हे लेणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: