माझी पाली यात्रा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 January, 2011 - 06:07

रविवार सकाळीच ह्यांच्या मित्राचा फोन आला. गाडी नविन घेतली आहे म्हणून पहिला पालीला न्यायची आहे. तुम्ही दोघ पण चला आमच्याबरोबर. आयत्या वेळी असल्याने मी हो-नाही करत होते. कारण घरात कामेही काढलीहोती आठवड्याची. पण मग म्हटल जाऊदे नाही सांगितल तर भाव खातो म्हणून पुढच्यावेळी विचारणार नाही ह्या भितीने आम्ही दोघांनी येतो म्हणून सांगितल :स्मित:. १२ वाजेपर्यंत भराभर कामे आटपुन निघालो. गाडी छानच होती. चालवायलाही दुसरा मित्रच होता. गाडीत गाडीचे मालक नवरा-बायको, मुलगा होता. गाडीत बसल्यावर चर्चेत कळल की आज नॉनव्हेजच खायचे म्हणून दर्शन घेतल्यावर जेउ. मला माझ्या मुलीची काळजी वाटली पण त्यांनी लहान मुलांना खाउ आणला होता. नॉनव्हेज खायचे म्हटल्यावर जेवणाच्या वेळेची लागलेली भुक उडून नॉनव्हेजच्या कितीही उशिर होणार असला तरी चालेल अश्या पोझिशनवर गेली.

पालीला आम्ही पावणेदोन दोन ला पोहोचलो. गेल्या गेल्या आधी तिथला फेमस कोकम सोडा प्यायलो. दर्शन घेउन आल्यावर गोळा घेणार ही अट आमच्या नवर्‍यांना आधीच घातली होती.

देवळाच्या दिशेने काही फार गर्दि नव्हती. देवळाच्या आवारात शिरताच माझा कॅमेरा "मला बाहेर काढ" कुजबुज करायला लागला. त्याला शांत करण्यासाठी आधी देवळाचा कळसा सकट फोटो घेतला.
pali5.JPG

देवळाची ही गोल नक्षी मला आवडली.
pali6.JPG

देवळाच्या एंट्रीला लागुन एक जात दिसल. ह्या भल्या मोठ्या जात्याचा एकच भाग आहे तिथे.
pali4.JPG

पालीच्या बल्लाळेश्वराचे छान दर्शन झाले. दर्शन झाल्यावर लांबुन फोटो काढत मी देवळाच्या गाभार्‍यापर्यंत गेले कारण बाप्पा दिसत नव्हता. भाविक समोर येत होते. तेवड्यात तिथला शिपाई ओरडत आला. ओ मॅडम कॅमेरा जप्त करुन घ्यायचा आहे का ? इथे फोटो काढायचे नाहीत. मी आपला साळसुदपणाचा आण आणून त्यांना सांगितल सॉरी हं मला माहीत नव्हत इथे फोटो काढायची परमिशन नाही ते आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगुन खो खो हसले.

देवळाच्या बाहेर गेले आणि मला आनंदाच्या उकळयाच फुटल्या. बाहेरच्या तळ्यात सुंदर मासे होते. लगेच माबोकरांची आणि त्यांच्या विविध शब्दरचनांची आठवण झाली. म्हणजे जागुला बघुन तळ्यातुन मासे बाहेर आले, जागु नाही हे पाहुन तळ्यातुन मासे बाहेर पडले. जागु तिथे मासे अशा अनेक शब्दरचना. ह्यातील नक्की बरोबर कोणती ?
pali1.JPGpali2.JPG

ह्याच सुंदर तळ्यात हे मासे आहेत.
pali3.JPG

थोडा वेळ घुटमळून तिथल्या बाहेरच्या दुकानातुन पापड, लोणची घेतली. नवर्‍यांनी दिलेला शब्द पाळला म्हणजे आम्ही बर्फाचा गोळा खाल्ला नंतर गाडीजवळ गेलो. तिथुन पालीचा डोंगर छान दिसत होता.
pali.JPG

आता मात्र जेवणाचे वेध लागले होते. बरेच धाबे दिसत होते. पण आवड निवड ठरत पेणच्या एका निसर्ग हॉटेलमध्ये पोहोचलो. आतले गार्डन पाहुन खुपच समाधान झाले. सुंदर फुलेही फुललेली होती. फुलांच्या दुनियेत टाकेनच ती फुले.

जेवणाची ऑर्डर दिली. जेवण आले पण भुकेमुळे जेवणाच्या प्लेट्सचे फोटो काढायचे राहीलें नाहीतर आत्ता चांगले जळवता आले असते माबोकरांना. चान्स गेला.

खरी धमाल पुढे आहे. जेवण वगैरे आल्यावर मध्येच तिथला वेटर एक भला मोठा मासा घेउन आला. जिताडा त्याचे नाव. लहान मुलाला खेळण दाखवतात तस तो आम्हाला दाखवत होता. त्याने मला ओळखले नव्हते ना. मी लगेच फोटो काढला.
pali8.JPG

त्या वेटरला वाटल हे कुठल्यातरी वाळवंटातुन वगैरे आले असतील. त्याने त्या माश्याची किंमत चक्क रु.८,०००/- सांगितली. किंमत ऐकताच बर्फाने ताठ झालेल्या माश्यानेही आ करुन तोंड मोठे केले.
pali9.JPG

आम्ही एकमेकांकडे बघुन हसलो आणि त्याला नको सांगुन परत पाठवल. आम्ही विचार करु लागलो ह्याने हा मासा मध्येच का आणुन दाखवला ? मग माझी ट्युब पेटली आणि माबोकरांच्या शब्दरचना आठवल्या. आता ह्याला काय म्हणायचे ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू मासे खाते.
खाते मासे जागू.
मासे जागू खाते.

तिन्हीचा अर्थ एकच होतो.

पण

दिनेश मासा खातो
आणि
मासा दिनेश खातो

अर्थ बदलला, कि नाही ?

छान लिहिलंय..... पण बाप्पांचे दर्शन नाही झाले Sad

किंमत ऐकताच बर्फाने ताठ झालेल्या माश्यानेही आ करुन तोंड मोठे केले. Rofl