पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

Submitted by पाषाणभेद on 15 January, 2012 - 17:46

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

sarasgadh pali maharashtra
सुरूवातीची चढण

sarasgadh pali maharashtra

सरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो.

sarasgadh pali maharashtra
यावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.)

sarasgadh pali maharashtra
विस्तीर्ण पठारावर

sarasgadh pali maharashtra
येथे थोडी झाडी आहे.

sarasgadh pali maharashtra
उंच वाढलेले गवत

sarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtra
पाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे.

sarasgadh pali maharashtra
येथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते.

sarasgadh pali maharashtra
वरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो.

sarasgadh pali maharashtra
याच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे.

sarasgadh pali maharashtra
गुहा

sarasgadh pali maharashtra
पुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली!

sarasgadh pali maharashtra
येथून वरती जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत.

sarasgadh pali maharashtra
क्षणभर विश्रांती...

sarasgadh pali maharashtra
पहिला दरवाजा

sarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtra
येथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो.

sarasgadh pali maharashtra
किल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा.

sarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtra
हे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती.
थोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला.

sarasgadh pali maharashtra
राहण्यासाठी खोदलेल्या गुहा

sarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtrasarasgadh pali maharashtra
प्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला.

येथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत.

उतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली.

जरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.

गुलमोहर: 

फोटोज सुन्दर...निसर्ग प्रेमी आहात....

मी पाली गावचीच. पण कधी सरसगडावर जाता आले नाही. अन्दाजे किति वेळ लागतो गड चढण्यासाठी?

मुले अगदी मूडमधे ! फोटो छानच.
मी या गडाला मायबोलीवरच बघितलेय.
(तिथे मायबोलीच्या एका ग्रुपच्या चढाईवेळी भीषण अपघात झाला होता.)

छान

छान!
आम्ही चोरवाटेने पावसाळ्यात चोरवाटेने चढलो होतो. MSEB कार्यालयाच्या बाजूने ती वाट जाते. सरसगडाच्या भिंतीच्या डाव्या बाजूने वर चढते. पावसाळ्यात फुल्ल्ल घसरडी वाट होती.
तिथून पुढे गेल्यावर पायथ्यालाच पलीकडच्या टेपाडावर एक वस्ती आहे. तिचं नाव सांगाल का? विसरलो मी. (पासलकर वस्ती?)