पालीचा गणपती

Submitted by पाषाणभेद on 14 September, 2010 - 10:01

(पाली, ता. सुधागड, जि. रायगड)

|| पालीचा गणपती ||

मंदिर तुझे हे सुबक साजीरे
पालीच्या गणराया रुप तुझे गोजीरे

तुझ्या देवुळाचा आहे नागमोडी रस्ता
आनंद होत असे कळस तुझा दिसता

समोरच्या तळ्यात असे नितळ पाणी
तिथून मंदिर दिसे जसा महाल खानदानी

बाजुस हिरवा परीसर मागे किल्ले सरसगड
हे गणनायक गौरीनंदन वंदन करतो सच्या एक मुढ

- पाषाणभेद

(जालवहीवर पुर्वप्रकाशित)

गुलमोहर: