फुले

फुलांची शेती

Submitted by माधवी. on 30 July, 2012 - 00:16

फुलांच्या शेतीबद्दल येथे कुणास माहिती अथवा अनुभव आहे का?
व्यवसाय म्हणुन फुलांची शेती किती जोखमीची आहे?
शेत जमीन असल्यास सुरुवातीला किती भांडवल लागेल?
ह्या सर्व गोष्टींचे खात्रीलायक शंकानिरसन कुठे होऊ शकेल?

विषय: 
शब्दखुणा: 

Orchid फुलांची बाग-सिंगापुर

Submitted by यशस्विनी on 7 July, 2012 - 05:56

खालील फोटो हे सिंगापुरातील "Orchid" फुलांच्या बागेतील आहेत, तिथे Orchid फुलांचे अनेकविध प्रकार बघायला मिळतात त्यात मुळ प्रकार तसेच हायब्रीड प्रकार आहेत. या फुलांचे वैविध्य, रंगसंगती, त्यांची मांडणी खुप सुरेख व नयनरम्य आहे......... अंत्यत काळजीपुर्वकरीत्या ही सर्व फुले जतन केली गेली आहेत. सिंगापुरचे राष्ट्रिय फुल म्हणुन या देखण्या फुलाला राजमान्यता देखिल मिळाली आहे.....

१.

OO.jpg

२.

O1.jpg

३.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पारिजातक

Submitted by मंदार-जोशी on 22 August, 2011 - 03:45

आठवतं तुला?
दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता
एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो
तेव्हा तू हातात हात गुंफुन
थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस
एकत्र चालायचं का रे?

"अगं पण......"
पण काय? अरे वेड्या...
एक भयानक वादळ आलंय
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय
म्हणूनच साद घालते आहे तुला
निव्वळ माझ्यासाठी नव्हे रे
तुझीही तगमग बघवत नाहीये मला

सारे "पण" विसरुन तुझा हात हातात घेतला
ती जागा आणि तो क्षण अविस्मरणीयच
पण वादळ गेलं आणि लाटा पुन्हा शांत झाल्या
आपल्या वाटा पुन्हा फिरुन वेगळ्या झाल्या
आणि....
तो क्षण निसटलाच तेव्हा
हातातून वाळूचे कण अलगद निसटावेत तसा

गुलमोहर: 

फुलेच फुले

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 July, 2011 - 07:24

ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्‍यात साठवुन घेतली आहेत.
अ‍ॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले.
१) गुलाबी अ‍ॅडेनियम

२) लाल अ‍ॅडेनियम

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फुले काही अंगणातली काही भटकंतीतली.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2011 - 03:52

माझ्या अंगणातली फुले ह्या मागच्या भागात काही अंगणातली फुले टाकायची राहीली होती. ती टाकत आहे.

प्रचि १) पिवळी शेवंती

प्रचि २) लाल शेवंती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझ्या अंगणातीले फुले

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 April, 2011 - 02:55

ही माझ्या अंगणातली फुले

राणी कलरची सदाफुली
From Apr 21, 2011

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 

ती फुलराणी

Submitted by माधव on 14 December, 2010 - 06:44

गुलाब, ग्लॅडीओलस, कार्नेशन अशा फुलदाणीत दिमाखाने मिरवणार्‍या अथवा जास्वंद, मोगरा, झेंडू, शेवंती अशा देवघर प्रसन्न करणार्‍या फुलांपेक्षाही वेगळी अशी एक फुलांची दुनीया असते - रानफुलांची किंवा गवतफुलांची! पण ह्या फुलांचे सौंदर्य बघायचे असेल तर आपली दृष्टी बदलावी लागते. नाहीतर त्या फुलांचे सौंदर्य तर सोडाच पण ती फुले नजरेस पडणे पण अवघड असते. ह्यातली बरीचशी फुले नखाहूनही लहानशा आकाराची असतात. ह्या फुलराणीला पहायची खरी मजा हिरव्यागार मखमालीवर खेळतानाच येते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लाजाळूची फुले....

Submitted by श्रीकांत on 25 November, 2010 - 14:41

"मग याला इंग्रजीत काय म्हणतात?"

"टच मी नॉट"

"अन हिंदीत?"

" हिंदीत तर फार सुंदर नाव आहे, छुईमुई!!"

माझ्या मुला बरोबर चालणारा माझा नेहमीचा शब्दांचा खेळ नेहमी सारखा रंगात आला. काही पण बोलता बोलता आमचा हा खेळ सुरु होतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - फुले