निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, नक्कीच. २५ मार्चच्या पुढे कधीही चालेल मला. गावी जायच्या आधी गेलो तर उत्तम. काहीतरी घेताही येईल. तसेही मी जाणारच होते. तुला विचारावे का हाच विचार करत होते Happy

साधना चांगल काम केलस. मी अ‍ॅडमिनला लिहीणारच होते जागा वाढवुन द्यायला पण बर झाल दुसराच धागा काढलास ते.

धन्स साधना, दिनेशदा, मामी, शोभा१२३.
मी परवाच हा धागा पाहिला. खूपच छान व उपयुक्त माहिती आहे.
निसर्ग गटग करणार असाल तर मी तयार आहे यायला.

साधना, शनिवारी अमि जाणार आहे माझ्या घरी. तशी पॅशनफ्रुटच्या वेलाची पहिल्यांदा वाढ कमीच असते. आधीची ८/१० पाने साधी येतील, मग त्रिशूळासारखी पाने येतील आणि मग वाढ जोमाने होईल.

मी अमी, पत्ता पाठवुन दे संपर्कातुन फोन नंबरसकट, कुरिअर करते.

दिनेश, आम्ही शनीवर्कर आहोत हो.. आणि मला तर डबल ड्युटी आहे. Happy लेक आल्यावर एकदा राणीबागेत जाणार आहे तिला घेऊन. तेव्हा जाईन तुमच्या घरी. आणि जर गावी जाणॅ त्याच्याआधी झाले तर मग एक संध्याकाळ जावे लागेल तुमच्या घरी.... Happy वेल गावी लावायचाय ना...

हाय,
मी बरेच दिवस हा धागा वाचत होते. आज लिहायचा विचार करत होते तर धागाच बंद झाला होता. साधना, बरे झाले नवीन धागा काढलास ते.
ईथे वाचुन मी घरी अळु लावले होते. मस्त आलेत. आता पुढ्च्या आठवड्यात करेन त्याच्या वड्या.
माहेरी आईने कमी जागेत खुप झाडे लावली होती. उन्हाळ्यात अक्षरशः बादल्या नेउन रोज पाणी घालयची. आणि झाडे जगवायची. बरीचशी फुलांची, ओवा, गवती चहा, कडिपत्ता, हळद, कोरफड आणी काही शोभेची वगैरे.
पण लोक खुप त्रास देतात जर तुमची बाग खाली असेल तर. आमच्याकडे तर गुलाबांची फुलेच काय लोकांनी कुंड्यासकट रोपेच पळवली होती. एकदा नाही तर प्रत्येक वेळेस. तरी पुन्हा पुन्हा नवीन लावली होती. जास्वंद, स्वस्तिक, गोकर्ण, झेंडु, शेवन्ती, सोनटक्का, लिली, ऑफिस टाईम, चिनी गुलाब, गणेशवेल, वेगवेगळ्या रंगांची गुलबक्षी, सदाफुली, कर्दळ याची पण फुले कायम लोक तोडुन न्यायचे. वर काही म्हणायला जावे तर देवालाच नेतोय हे वर आम्हालाच ऐकवायचे. निशिगंधाचीही खुप होती. त्याला पण फुले यायला लागली की लोक फुले तर तोडायचेच तर त्याबरोबर वर आलेला पूर्ण गेंदच तोडायचे. असे खुपदा झाल्यावर तर माझी बहीण रडायलाच लागली होती.
आई पण या गोष्टीला खुप वैतागली होती. मधे बरीच झाडे कमी झाली होती. तेव्हा बघुन कसेतरीच झाले होते. आता पुन्हा काही लावली आहेत. उचलुन नेता येणार नाही अश्या कुंड्यांमधुन. आणि गुलाबाची सोडुन.
अजुनही फुले जातातच पण झाडे तरी वाचतात.
अजुन एक गंमत, आईने कर्दळ एकीकडे आणि हळद दुसरीकडॅ लावली होती. तर काही लोक आम्हाला म्हणायचे की ईकडच्या कर्दळीला फुले येत नाहीत तर कश्याला ठेवलीय अजुन. आम्ही फक्त हसायचो. कारण उत्तर दिले तर उद्या हळद पण जायची.(तेवढी एकच बिचारी वाचली कायम).
बापरे ! खुपच मोठे पोस्ट झाले.

अजुन एक दोन झाडे होती. पण नक्की नावे आठवत नाही आहेत.
एक जास्वंदीच्या कळीसारखेच पण लाल भडक फुले असणारे झाड होते. आम्ही त्याला मिरचीचे झाड म्हणायचो. पण नक्की नाव आता नाही आठवत.
अजुन एक निशिगंधाच्या कुळातले एक झाड होते. पात निशिगंधाच्या पातीपेक्षा बरीच मोठी, याचा मोठा फुलांचा दांडा मात्र वर न वाढता पातीसारखाच खाली वाढायचा.त्यामुळे याचा पुर्ण दांडा टिकायचा आमच्याईथे. पण फुले जायचीच . याला मोठी पांढरी फुले येतात. विकतच्या हारातुन कायम दिसतात. पण बहुदा पाकळ्या कापुन घालत असावेत. बर्‍याच बागांमधुन दिसतात. त्याचे नावच आठवत नाही आहे आता. Sad

आस ते जास्वंदीचच झाड. त्याच फुल हे कळीसारखच असत. कधी फुलत नाही. माझ्या आईकडे पण होती आधी. त्यात फिकट गुलाबी रंग पण होता.

आस, ति एक प्रकारची लिली आहे. त्याचेही दोन प्रकार आहेत. एकात बुंधा फार जाड होत जातो.
इथे नैरोबीला, हार वगैरे करायची प्रथा नसल्याने, झाडावरच भरभरुन फूललेली असतात. फोटो काढलाय. उद्या परवा टाकतो.

हो. जागु आई जास्वंदच म्हणायची. पण आम्ही वाद घालयचो की दोन्ही पण जास्वंदीच कश्या म्हणुन Happy
दिनेशदा टाका नक्की फोटो. ते रोप आवडायचे मला खुप. त्याच्या कळ्या अर्धेवट उमलुन फुगीर भाग तयार होतो . मग संध्याकाळी आम्ही शाळेतुन घरी आलो की हलकेच त्याच्या टोकावर बोट टेकवायचो. आणि मग ते मस्त उमलायचे एकदम.

हे खास आस साठी.

हा फोटो मुंबईतला आहे. (हेच ना ते टिचकी मारायचे फूल )

हे आहे केनयातले (रस्त्याच्या कडेला असे भरभरून फूलले होते )

आणि हे जरा जवळून !!

शोभा, प्रचि १-२-३ सगळे एकच आहेत गं.. यांना मंद वास येतो असे मला तरी अंधुकसे आठवतेय. दिनेश यांचे नाव काय हो?? मला माहित होते पण आता आठवत नाहीय Happy

हे फुल अग्दी फुलायला आले की मस्त दिसते.. तेव्हाच टिचकी मारायची. अर्थात मी कधी मारली नाही.

मला कायम एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. कुठलेही फुल कळीबंद असताना आपण उघडायचा प्रयत्न केला तर वाट लागते त्याची. फाटुन जाते एकदम. कळी असताना पाकळ्या एकदम आत घडीबंद असतात, चुरगळल्यासारख्या दिसत असतात. पण तेच फुल स्वत: उलगडते तेव्हा मात्र पाकळ्या एकदम इस्त्री मारुन कडक, एकही चुरगळ नाही.... फुलायच्या आधी घाईघाईत लाँड्रीत फेरी मारुन येतात काय????? Happy

साधना, अग, प्रची १ वेगळी आहे ना? त्याच्या पाकळया वेगवेगळ्या आहेत. आणि प्रची २ व ३ एकमेकाना जोडलेल्या आहेत. (हे माझं अज्ञान असेल.सांभाळून घ्या ग.) Proud

मला कायम एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. कुठलेही फुल कळीबंद असताना आपण उघडायचा प्रयत्न केला तर वाट लागते त्याची. फाटुन जाते एकदम. कळी असताना पाकळ्या एकदम आत घडीबंद असतात, चुरगळल्यासारख्या दिसत असतात. पण तेच फुल स्वत: उलगडते तेव्हा मात्र पाकळ्या एकदम इस्त्री मारुन कडक, एकही चुरगळ नाही.... फुलायच्या आधी घाईघाईत लाँड्रीत फेरी मारुन येतात काय?????

>>> मस्तच निरीक्षण आणि कल्पना ग साधना! Happy

फुलायच्या आधी घाईघाईत लाँड्रीत फेरी मारुन येतात काय?????>>> Lol
मस्तच निरीक्षण आणि कल्पना ग साधना!>>>>१००० मोदक.

साधना, मग कोषातून फूलपाखरु बाहेर येताना, किंवा चतूर बाहेर येताना बघायलाच हवा. ते सूर्य उगवायचा आत बाहेर येतात. त्यांचे ओलसर पंख, आपल्या डोळ्यासमोर उलगडताना बघणे अवर्णनीय असते.

जास्वंदी / गुलाब यांच्यासारख्या फूलांच्या कळ्या (ज्या उद्या उमलणार आहेत अशा ) झाडावरच लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवायच्या. दुसर्‍या दिवशी सूर्य उगवल्यावर ते कापड काढायचे. आपल्या डोळ्यासमोर भराभर कळी उमलते.

त्या फूलांना मराठीत तरी पांढरी लिलीच म्हणतात. पहिले फूल आहे त्याचा बुंधा जाड असतो आणि पाने पण रुंद असतात.

व्वा दिनेशदा, पांढ-या लिलीचे प्रचि मस्तच! रात्री ही फुले चांदण्यांसारखी दिसतात Happy
मी एकदा, त्याच्या कळीला उमलण्याच्या वेळेस एकटक पहात पुर्ण संयम ठेउन ते कसे उमलते त्याचे निरिक्षण केले होते.
Proud

साधना,
निसर्गाच्या गप्पा- २ बद्दल धन्यवाद !

दिनेशदा,
जास्वंद ,गुलाबाबदल छान महिती !
Happy
(नि.ग-सगळे गटग मुंबईतच का ? :राग:)

गेल्या आठवड्यात उदयपूरमध्ये हॉटेल उदयविलास ह्या ऑबेरॉय ग्रुपच्या रीसॉर्टमध्ये काम होते. २० एकरात त्यांनी लावलेली झाडं हे त्यांचे हॉर्टिकल्चर डॉक्टर गुलाब ह्यांच्या समवेत बघण्याचा योग आला. काही फोटू डकवतो इकडे नंतर.

Pages