ती फुलराणी

Submitted by माधव on 14 December, 2010 - 06:44

गुलाब, ग्लॅडीओलस, कार्नेशन अशा फुलदाणीत दिमाखाने मिरवणार्‍या अथवा जास्वंद, मोगरा, झेंडू, शेवंती अशा देवघर प्रसन्न करणार्‍या फुलांपेक्षाही वेगळी अशी एक फुलांची दुनीया असते - रानफुलांची किंवा गवतफुलांची! पण ह्या फुलांचे सौंदर्य बघायचे असेल तर आपली दृष्टी बदलावी लागते. नाहीतर त्या फुलांचे सौंदर्य तर सोडाच पण ती फुले नजरेस पडणे पण अवघड असते. ह्यातली बरीचशी फुले नखाहूनही लहानशा आकाराची असतात. ह्या फुलराणीला पहायची खरी मजा हिरव्यागार मखमालीवर खेळतानाच येते. एखाद्या लहान बाळाशी खेळताना जसे आपण आपले सगळे व्याप बाजूला ठेवतो, निवांतपणे जमिनीवर फत्कल मारून त्यांच्याशी खेळतो तोच निवांतपणा ही फुले बघतानाच हवा. आणखी एक म्हणजे आपला माणूस असण्याचा तोरा विसरून, त्यांच्याएवढे लहान होऊन, त्यांच्या पानळीवरून त्यांना पाहिलेत तर ती तुम्हाला खरेखुरे दर्शन देतील.

ही आहेत कासच्या पठाराची निसटती ओळख--

तेरड्याचा रंग

तेरडा, सफेद गेंद आणि सितेची आसवे

कास सादर करत आहे मिकी माऊस (स्मिथीआ)

सोनकी

सफेद गेंद आणि सितेची आसवे

जांभळी मंजिरी

सब्जा

भारंगी (हिच्या पानांची भाजी करतात)

हत्तीची सोंड (Vigna Vexillata) हे एक खास फूल आहे. किटक मधाच्या लालसेने सोंडेसारख्या भागावर बसतो आणि केंद्राकडे जायला लागतो. जसा तो आत जातो तसे त्याच्या वजनाने फुलाचे पुकेसर नळीसारख्या भागातून बाहेर येतात आणि किटकाच्या अंगाला चिकटतात.

टोपली कारवी - ही ८ वर्षांनी बहरते. इतर वर्षी चुकार फुलेच दिसतात. हिची झुडपे उलट्या टाकलेल्या टोपलीसारखी दिसतात म्हणून टोपली कारवी.

आभाळी

निलवंती

आभाळी आणि निलवंती ही दोन्ही सायनोटीस कुळाटील आहेत. याच कुळातील नभाळी पण कासला दिसते.

अबोलिमा - शांत शालीन सौंदर्य

दुधाळी - फाद्यांच्या खास रचनेमुळॅ वर्गमूळ असेही म्हणतात. Happy

मराठी नाव माहित नाही पण शास्त्रीय नाव Pinda Concanensis.

आरारुट

तेरड्याचा एक प्रकार - किटक उतरण्याकरता एक आदर्श धावपट्टी

कॉमेलीना

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे काय इतकेच ? समाधान नाही झाले, अजून हवेत.
त्या मिकिमाऊसचा एक वेगळा प्रकार आहे आमच्याकडे. मग स्वतंत्रपणे पोष्टीन.

सुं द र प्रकाशचित्रे!!!

सितेची आसवे? फुलांना अस नाव असत? >>>>श्यामली या फुलांचे नाव "सितेची आसवे" असे करूण असले तरी त्या फुलांची जात "किटकभक्षी" वर्गात मोडते. Happy

Pages