--आई--

ती

Submitted by सामो on 26 December, 2021 - 05:19

She was a troubled soul. तिच्या आठवणींचं कोलाज मनात रेखाटू लागते आणि वळवाच पाऊस भरुन येतो. ढग, वीजा, कुंद हवा, वावटळ आणि एक चिमटीत न पकडता येणारं, गदगदुन आलेला मूड. पण पाऊस काही केल्या पडत नाही. तिच म्हणायची "असं आभाळ दाटून आलं की तुला गलबलल्यासारखं होतं का गं?" आणि न कळणा र्‍या त्या वयात मी म्हणत असे "नाही. असं काही होत नाही मला." मला कुठे माहीत असायचं तो र्हेटॉरिक प्रश्न असायचा. 'आईच्या नसलेपणातून आलेला' ..... त्यामुळे आपल्या लहानग्या मुलीलाच विचारला गेलेला र्‍हेटॉरिक प्रश्नं. पावसाळी हवेत कासाविस होत असे ती, डोळे विनाकारण ओलावायचे. तिच्या आईची आठवण येत असेल का तिला?

शब्दखुणा: 

आई

Submitted by Santosh zond on 8 May, 2021 - 22:53

आई
शब्दात नाही व्यक्त होऊ शकत यार पण खरच कुणीतरी खूप सुंदर म्हटलेले आहे “देव एका वेळेला सगळया ठिकाणी कसा असु शकतो ना! म्हणून त्याने आई हे सुंदर नात निर्माण केल”,तुमच्यामध्ये स्वतःला बघणारी,स्वत:चे अश्रु लपवुन फक्त तुमच्यासाठी हसणारी,स्वत:ची स्वप्न मोडुन तुमची स्वप्न जगणारी,सगळ काही फक्त तुमच्यासाठीच असत,स्वत:साठी अस ती काधीही विचार करतच नाही पण कधी तुम्ही करता का तिच्यासाठी विचार? मग तुम्हीही ठरवायचे कधीही काहीही झाल तरी ती दुखायला नको,तुमच्यामुळे तिच्या चेहर्‍यावर नेहमीच हसु असायलं हवं.....
Happy Mother's Day

शब्दखुणा: 

आईच तर आहे..!

Submitted by पाचपाटील on 6 May, 2021 - 15:22

कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि
पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते,
असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..!
आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं.. आणि काही दिवस तो विस्कटून जातो..!

मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे...
एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी..
विचारपूस करावी सगळ्यांची...
स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे..
पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी,.. काळजी करू नकोस.. होईल माझं सगळं व्यवस्थित...!

एवढंही खूप असतं आयांना..!!

शब्दखुणा: 

--आई--

Submitted by Nilesh Patil on 12 May, 2019 - 05:07

--आई--

देते पदर आई बाळास उन्हात चालतांना,
येता भरून डोळे तिज अनवाणी पाहतांना..।
तेव्हाच खरी आई साऱ्या जगास कळते,
जेव्हा येणारे दुःख ती हसत सहन करते..।

आई असते साऱ्या-साऱ्या जगास वंदनीय,
देवापेक्षा अधिक आईच असते पूजनीय..।
या ब्रम्हांडाला आईविना काय अर्थ आहे,
हा संसार,हे जीवन आईविना व्यर्थ आहे..।

हे जीवन आपणास आईमुळेच मिळाले,
तिच्याच कष्टामुळे जग आपणास कळाले..।
तीने आपणास चालणे-बोलणे शिकवले,
हात हातात धरून अक्षर लिहिणे शिकवले..।

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - --आई--