--आई--

Submitted by Nilesh Patil on 12 May, 2019 - 05:07

--आई--

देते पदर आई बाळास उन्हात चालतांना,
येता भरून डोळे तिज अनवाणी पाहतांना..।
तेव्हाच खरी आई साऱ्या जगास कळते,
जेव्हा येणारे दुःख ती हसत सहन करते..।

आई असते साऱ्या-साऱ्या जगास वंदनीय,
देवापेक्षा अधिक आईच असते पूजनीय..।
या ब्रम्हांडाला आईविना काय अर्थ आहे,
हा संसार,हे जीवन आईविना व्यर्थ आहे..।

हे जीवन आपणास आईमुळेच मिळाले,
तिच्याच कष्टामुळे जग आपणास कळाले..।
तीने आपणास चालणे-बोलणे शिकवले,
हात हातात धरून अक्षर लिहिणे शिकवले..।

घरदार सांभाळी आई लावी जीव पिल्लांना,
स्वतः उपाशी राहून मात्र घास भरी मुलांना..।
अशीच माझ्या आईची माया अपार आहे,
तिच्याच मुळे माझ्या जीवनास आकार आहे..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो.९५०३३७४८३३--

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users