बंदिश

Submitted by 'सिद्धि' on 12 October, 2019 - 02:50

" निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्‍या अविनाशला विभा विचारत होती.
" हो ! " .... त्याने मागे वळून न पाहताच उत्तर दिले.
ती पुन्हा... " का ? आणि मला न भेटताच ? "
" तो येतोय ना ! " परत त्याने मागे न पाहताच उत्तर दिले.
" जसा तू यायचास तो नसताना , तसाच तो येतोय पण तू असताना ! "... विभा हसत म्हणाली.
" विभा हे शक्य नाही. '
" अरे पण का ? "
" वेड्यासारखी वागू नकोस. दोन्ही समतुल्य नाती संभाळणे तुला जमेल का ? "
" म्हणुन तू जाणार आहेस का रे ? " ..... विभा काकुळतीला येऊन म्हणाली.
" हो. तो आता परत येतोय तर मी इथे थांबने योग्य नाही वाटत. "
" मग तो गेला तेव्हा त्याने विचार केला का माझा ? "...तीने परत प्रश्न केला.
" त्याच्याकडे पर्याय नव्हता ग, आणि तुच त्याला तुझ्या पासून दुर ठेवलेल ना. स्वतःहून . "
"तेव्हा माझ्याकडेही पर्याय नव्हता, पण आता आहे. ".... विभाने एका झटक्यात उत्तर दिले.
" म्हणजे ? "... अविनाश ने विचारले.
" अवी, तू कुठेही जात नाहीयेस. "... विभा त्याचा जवळ येत म्हणाली.
" तुला जमेल का ग अशी दोन नाती जपायला ? कात्रीत सापडशील. आणि मला ते पहावणार नाही. निघतो मी "

काहीतरी धडपडण्याचा आवाजाने तो सरकन मागे वळतो....
" तुझी व्हिलचेअर कुठे आहे ? आणि हे काय , तू आता आधाराने उभी राहू शकते . " (तो आश्चर्य आणि आंनदाने)
ती धडपडत... " हो . गेले काही दिवस काठीच्या आधाराने चालते मी . मग धाप लागली की अशीच कोसळते . मग स्वत:ची स्वत:च उठून बसते. '
" आधी का सांगीतले नाहीस ? "... अविने तीला आधार देत परत प्रश्न केला.
" गेले काही दिवस तू आलाच नाहीस . कस सांगणार ? एक सांगू .... तुझी बंदिश मनात एवढी रेंगाळत रहाते की , तू नसतानाही असल्याचा आभास होतो. सवय झाली आहे मला आता याची. बरेच दिवस तू आला नाहीस. मी वाट बघुन-बघुन तुझीच कॅसेट टाकुन म्युझीक प्लेअर ऑन केला . पण त्याची वायर माझ्या व्हिलचेअरला अडकली आणि खाली पडला तो . कॅसेट आतल्याआत अडकली. आतडी पिळवटावी तस वाटल मला.... क्षाणात बंद पडला होता तो म्युझीक प्लेअर ..... आणि जणु माझा श्वास कुणी बंद करत आहे अस वाटल . " ..... बोलता बोलता तिला धाप लागली.

" शांत हो "...दोन्ही हातानी उचलून आपल्या जवळ घेत तो तीला घेऊन समोरच्या बाकडावर बसवत तो म्हणाला.
एकटक त्याचाकडे बघत ती परत बोलायला सुरुवात केली..... " त्या दिवशी मला माझ्या व्हिलचेअरचा खुप राग आला होता . होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून उठले. सरकत जमीनीवर कोसळले आणि भिरकावून दिली ती चेअर.... खुप दुर.... कायमचीच.... मग उठवा येईना की हलता येईना, बसल्या जागी कळा यायला लागल्या, खुप त्रास झाला. पण मी तीला परत हातच लागला नाही . आता अशीच चालते ... कधी लहान मुला सारखी रांगत तर कधी फरपटत . पण ज्या तुझ्या बंदिशीचा मी राग-राग करायची, तीच एखादी बंदिश ऐकल्या शिवाय आता मला झोप येत नाही. सार कस क्षाणात बदलत ना रे ! "

" तुला आरामाची गरज आहे. तू आतमध्ये चल. मला निघायला हव "... अविनाशने तीला उठवण्याचा प्रयन्त केला.
" नको थांब अवि , ही बघ ? " .... ती एक छोटीशी खड्याची अंगठी त्याच्यासमोर धरत ती .
" ही ही अंगठी अजुन तुझ्याकडे आहे . "
" हो "
" पण अमु परत येतोय . दोन नाती संभाळण सोप नाही आहे. जमेल तुला ? "
" नाही जमनार. म्हणुन एक नात मी कायमचच पुसून टाकणार आहे."
तो चमकून... " कोणत ?"
" आपल केवळ दिखाव्याच्या मैत्रीच नात संपणार. आणि अमुला सांगून टाकणार आहे मी की, तुच त्याचा बाप आहेस.... आपणच त्याचे आई वडील आहोत. पण
बीना लग्नाचे . "
तो बॅग उचलत ... " आज इतक्या वर्षानंतर तू स्विकारते..... हे नात जर त्याने स्विकारलच नाही तर ? नकोच ते प्रश्न... मला निघावच लागेल. तेच योग्य आहे "
" खुप मोठा झालाय आता तो. समजुदार ही.... त्याला याचा स्विकार करावाच लागेल. न स्विकारुन सत्य बदलनार आहे का?
अजुन एक.... आपल हे मैत्रीच नात संपल आता... मग या नविन नात्याला नविन नाव द्याव लागेल ना ? काय म्हणतोस ? "... तीने अनपेक्षित प्रश्न केला.

तो परत चमकुन.... " तुझी कोडी संपत नाहीत. विभा तुला नक्की काय म्हणायच आहे ? "
तीने हात पुढे केला.... " घालतोस ना अंगठी ? "

थोडस हसु आणि साठलेले आसु सावरत तो बाकावर बसला तिच्या शेजारी.... बोटामध्ये अंगठी सरकवत त्याने तीला ह्रदयाशी धरल. डोक्यावरील कुंदीची चार शिळी फुले टपटप गळून त्याच्या अंगावर पडली....जशी अल्हाददायक वार्‍याच्या एका झुळूकी सरशी वर्षानुवर्षाची बंधने गळून पडावी.
ती त्याच्या छातीवर डोक ठेवत... " तुझ्या बंदिशने या बंदिस्त जिवनातुन मला मुक्ती दिली. जरी अमूच्या वेळेस माझ्या कठीण काळात मला तू सोडुन गेला असलास तरी या कठीण काळात जेव्हा माझ्या जवळ कोणीही नव्हत. तेव्हा तू होतास. म्हणुन मी त्या जुन्या कटू आठवणी पुन्हा उगाळत बसायच नाही अस ठरवलय. नव्याने सुरुवात करु. "

त्याने दोन्ही हातांचा वेढा घालत तीला अजूनच जवळ घेतल . ज्या बंदिशीचा प्रेमापोटी त्याने विभाला दुर लोटल होत. तीच त्याची एक अव्यक्त बंदिश आज पुन्हा एकदा बंदिस्त झाली होती . अगदी अविभाज्य..... त्याच्यापासून पुन्हा कधीही विलग न होण्यासाठी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक आहे कथानक!
> जरी अमूच्या वेळेस माझ्या कठीण काळात मला तू सोडुन गेला असलास तरी या कठीण काळात जेव्हा माझ्या जवळ कोणीही नव्हत. तेव्हा तू होतास. म्हणुन मी त्या जुन्या कटू आठवणी पुन्हा उगाळत बसायच नाही अस ठरवलय. नव्याने सुरुवात करु. > हे असं करता येणं शक्य आहे का माहीत नाही....

सिद्धी बरेच पदर आहेत गं. वाचकांवर विश्वास टाकलायस की ते प्रगल्भ्पणे फिल इन द ब्लँक्स करतील. आणि विश्वास टाकला की मगच तो पूर्णत्वास नेला जातो. या न्यायाने मी संगती लावते.
- अविनाशला गाण्याची अतिशय आवड आहे
- विभा व अविनाश दोघांच्या मीलनातून अमु गर्भ राहीला पण तेव्हा गाण्याच्या नादापायी तो विभाला एकटे सोडुन गेला.
- पुढे विभा अपंग झाली तेव्हा मात्र तो आधार म्हणुन परत आलेला दिसतोय. पण अजुन अमुला माहीत नाहीये.

ॲमी - थॅक्स.
हे असं करता येणं शक्य आहे का माहीत नाही.... + ११११

सगळ्यांनाच नाही जमत ते..... आणि कठीण ही आहे. पण नवी सुरुवात केव्हाही आशादायी असते.

सामो - थॅक्स
- अविनाशला गाण्याची अतिशय आवड आहे
- विभा व अविनाश दोघांच्या मीलनातून अमु गर्भ राहीला पण तेव्हा गाण्याच्या नादापायी तो विभाला एकटे सोडुन गेला.
- पुढे विभा अपंग झाली तेव्हा मात्र तो आधार म्हणुन परत आलेला दिसतोय. पण अजुन अमुला माहीत नाहीये.

सामो तुझे तीन्ही मुद्दे माझ्या कथेचा गाभा आहे.
तू म्हणतेस तस वाचकांवर विश्वास आहेच. प्रत्येक जन आपापल्या पद्धतीने तर्क लावणार आणि अर्क ही काढणार, इथे त्याची पुर्णपणे सुट आहे.
* विश्वास टाकला की मगच तो पूर्णत्वास नेला जातो.+१११११११

या लिखाणाला काय म्हणावं सुचत नाहीये. अप्रतिम!
अगदी कमी शब्दांत, एक मोठा पट डोळ्यासमोर उलगडून गेला.
एक क्लासिक स्टोरी, अश्या कथा कमीच वाचायला मिळतात, आणि जेव्हा वाचायला मिळतात, इट विल मेक डीप इम्पॅक्ट!!!!!
हॅट्स ऑफ!!!

> पण नवी सुरुवात केव्हाही आशादायी असते. > नवीन सुरवात, नवीन माणसासोबत असेल तर बरं.

> सगळ्यांनाच नाही जमत ते..... आणि कठीण ही आहे. > Forgive but don't forget. चुकीबद्दल प्रायश्चित घेतलं तर माफ करा पण अजून वर बक्षिस देऊ नका.

पण माझे विचार जगातील सगळ्या व्यक्तीनी + काल्पनिक व्यक्तिरेखानीदेखील फॉलो केले पहिजेत असे काही म्हणणे नाही Wink Proud

सिद्धी काय सुंदर लिहिलंय ग, काश ऐसा हुनर भगवान ने हमे भी बक्षा होता.
Happy
आता इथे सगळे आपापल्या परीने रसग्रहण लिहितच आहेत, तर त्यात माझीही थोडीशी भर.
मानवी भावनांचा गुंता कधीच सरळ नसतो, प्रेमाचा गुंता तर कधीच नाही. कधीकधी आपली जवळची व्यक्ती खूप मोठी चूक करून जाते, मन सैरभैर होतं, आपण होरपळतो.
मात्र कालांतराने ती व्यक्ती आपल्या जवळ आली, आणि पुन्हा त्याच जुन्या नात्याच्या सुखद आठवणी पुन्हा देऊ लागली, तर आपण ठरवायचं असतं, ते नातं पुढे न्यायचं की नाही. पण फक्त कठीण काळात सोडून गेली, म्हणून संधी द्यायची नाही, आणि आता हे नातं हवंहवंसंही वाटतंय, या गोष्टीत होरपळत बसणंही चुकीचंच.
(माणसाला एक तर शांत मरण हवं असतं, नाहीतर सुखद जीवन, ना जगणं ना मरणं या स्थितीत राहणं फार भयानक असतं, अर्धवट नात्यासारखं)

हायला माझ्या लिखाना पेक्षा तुमचे प्रतिसादच मला भारी वाटून राहीलेत. Bw Bw
- सगळ्याचे मनापासुन आभार.

- (कथा की प्रसंग? Proud )
पद्म प्रत्येक कथाही प्रसंगच असते मग ते एक किवा अनेक असतात.... इथे एक प्रसंग आहे पण या मध्ये काही वर्षाची गुंतवणूक आहे.

- एक क्लासिक स्टोरी, अश्या कथा कमीच वाचायला मिळतात, आणि जेव्हा वाचायला मिळतात, इट विल मेक डीप इम्पॅक्ट!!!!!
थॅक्स अज्ञातवासी

- पण माझे विचार जगातील सगळ्या व्यक्तीनी + काल्पनिक व्यक्तिरेखानीदेखील फॉलो केले पहिजेत असे काही म्हणणे नाही .
ॲमी exactly... प्रत्येकाचे विचार वेगळे असतात.

- काश ऐसा हुनर भगवान ने हमे भी बक्षा होता.
श्वेता तुझी कथा वाचुन मलाही असच वाटत. Lol
माणसाला एक तर शांत मरण हवं असतं, नाहीतर सुखद जीवन, ना जगणं ना मरणं या स्थितीत राहणं फार भयानक असतं, - perfect sentence

- कमीत कमी 130k view आणि ५०० लाईक्स मिळतील जर विडिओ बनवला तर.
सप्रस एवढी स्तुती थॅक्स... भारावुन गेले मी.
खरच व्हिडीओ बनवा रे कुणीतरी. Lol

छान आहे कथा! प्रॅक्टिकली पटत नाही खरं तर, पण या प्रेमाच्या गोष्टींमध्ये काही सांगता येत नाही. या विषयावर एक ताजी ताजी गरम गझल लिहिली आहे हिंदी.. इथे करता येईल का प्रकाशित?

या विषयावर एक ताजी ताजी गरम गझल लिहिली आहे हिंदी.. इथे करता येईल का प्रकाशित?
अजिंक्य बिनधास्त करा. आणि नविन धागा कढ्लात तर इथे लिंक दिलीत तर बर होईल .
आणि प्रतिसादासाठी धन्यवाद. (ऑनलाईन होतेच म्हणुन लगेचच रिप्लाय केला. Lol )

खुप छान लिहीलय, आवडले Happy

<<सगळ्यांनाच नाही जमत ते..... आणि कठीण ही आहे. > Forgive but don't forget. चुकीबद्दल प्रायश्चित घेतलं तर माफ करा पण अजून वर बक्षिस देऊ नका.>>+ ११११११११११ हो न नाहीतर काय माहित ते बक्षिस आपल्यालाच अजुन एक भयंकर बक्षिस देऊन जाईल

Chan ahe

> नाहीतर काय माहित ते बक्षिस आपल्यालाच अजुन एक भयंकर बक्षिस देऊन जाईल > अमु२ का Sad मग ते लॉन्ड्री लिस्ट मधल्यासारखं ४०-४५तले गर्भारपण आणि मग गचकायच! Sad

पण खरंच गंभीरपणे - विभाला गर्भार करून तो अवि निघून गेला होता, कलेसाठी. हिने एकटीने मुल वाढवलं (खरंतर गर्भपात करायला हवा होता पण ठिकय). अवि कधी परत आला? आता काही दिवस/महिन्यांपूर्वीच असावा. मधल्या काळात तो अमुसाठी कमीतकमी पैसेतरी पाठवत होता की नाही हे कथेतून कळत नाहीय. हा असला जड भूतकाळ असताना म्हातारपणी अपंग झाल्यावर सेवा केली म्हणून मुआफ करून टाकलं हे शक्यतरी आहे का?

विभाला गर्भार करून तो अवि निघून गेला होता -
- या मध्ये ती ही तेवढीच जबाबदार होती.

पण ज्या तुझ्या बंदिशीचा मी राग-राग करायची, तीच एखादी बंदिश ऐकल्या शीवाय आता मला झोप येत नाही. -
- यामध्ये ही गोष्ट क्लिअर होते की , तीला त्याच्या कलेचा राग होता....म्हणजे ती ही यानात्याच्या दुराव्याला कारणीभुत होतीच ना...चुका जेव्हा दोन्ही बाजुनी होतात तेव्हा अडुन न बसता पुन्हा नवी सुरुवात करने योग्य..... हे या कथेच सार आहे.

हा असला जड भूतकाळ असताना म्हातारपणी अपंग झाल्यावर सेवा केली म्हणून मुआफ करून टाकलं हे शक्यतरी आहे का?
- yes ॲमी nothing is impossible.
- तुझे विचार वेगळे आहेत.... अजुन कुणाचे विचार या पेक्षाही वेगळे असतील.... त्या काल्पनीक कथेशी सगळ्यांचे विचार जुळायलाच हवेत अस मला वाटत नाही.

VB & उर्मिला - प्रतिसादासाठी थॅक्स

सिद्धि,अप्रतिम लिहीलंय..
सगळ्यांची वेगवेगळी नजर!
कथेला बघण्याची वेगळी नजर आवडली.. Happy

विभा आणि अविनाश कथेत का होईना शेवटी एकत्र आले ते महत्वाचं!
रियल लाईफ मध्ये हा सीन भारतात घडणं तरी अजुनतरी अशक्य वाटतंय.

एका नात्याच्या दोन बाजू उलगडल्या जाताय.. विभा आणि अविचं मैत्री आणि प्रेम. प्रेमातून अमु चा जन्म झाला, त्यावेळी अवि साथ देऊ शकला नाही पण नंतर मैत्री त्याने म्हातारपणी का असेना निभावली. आता विभा ने अमुला जन्म द्यायचा निर्णय घेतला हे तिचं व्यकतिस्वातंत्र्य पण मुळात कथेचा तो गाभा आहे आणि कथा बीज त्यामुळे खुलून आलं आहे.