जरा विसावू या वळणावर - भटकंती मागोवा २०१६

Submitted by जिप्सी on 30 December, 2016 - 08:37

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नविन वर्षाचे स्वागत करायला आता काही तासच उरले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या भटकंतीचा मागोवा घेताना जाणवले कि यावर्षी जरा जास्तच भटकलो. Happy २०१६ ची सुरूवात माणदेशीच्या सफरीने झाली तर शेवट कोल्हापुर भटकंतीने. सातारा परिसरातील कल्याणगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड, वारूगड, पुण्यातील सिंहगड, मल्हारगड, नाणेघाट, पन्हाळा, कर्जत तालुक्यातील पेडगावचा किल्ला (बहादुरगड), रायगड जिल्ह्यातील उंबरखिंड, वढु-तुळापुर येथील संभाजी राजांची समाधी, मायबोलीकरांसोबत हरिश्चंद्रगड इ. ऐतिहासिक स्थळे, मायबोलीकरांसोबत उरण, बदलापुर येथील गटग, यवत येथील अप्रतिम भुलेश्वर मंदिर, सासवड परिसरातील मंदिरे, मालेगाव, झोडगे येथील माणकेश्वर मंदिर, कोल्हापुर मधील खिद्रापुर येथील कोपेश्वर मंदिर, अष्टविनायकातील पालीचा बल्लाळेश्वर, रांजणगावचा महागणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, नरसोबाची वाडी, कोल्हापूर महालक्ष्मी, जोतिबा इ. मंदिरे, कायम स्मरणात राहणारी नागपूर, औरंगाबाद भटकंती, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊसृष्टी, मेणवली,वाई येथील प्रसिद्ध घाट, नांदगाव, नाशिक येथील गिरणा धरण, भंडारदरा येथील काजवा महोत्सव, कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धबधबा, माळशेज घाट, कोलाड येथील काष्ठशिल्प संग्रहालय, इ. महाराष्ट्रातील भटकंती तर डलहौजी, खज्जियार, चंबा, धरमशाला हि हिमाचल प्रदेशमधील भटकंती.

या सर्व २०१६ मधील भटकंतीच्या आठवणींचा हा कॅलिडोस्कोप. Happy

कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून ...
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
(मंगेश पाडगांवकर)

(०१) जानेवारी :- माणदेशी भटकंती
 (०२) फेब्रुवारी :- नागपुर भटकंती
 (०३) मार्च :- हिमाचल प्रदेश :- डलहौजी, खज्जियार, चंबा, धरमशाला
 (०४) एप्रिल :- मेणवली घाट(वाई, सातारा), उंबरखिंड(रायगड)
 (०५) मे :- हरिश्चंद्रगड
 (०६) जुन :- नाणेघाट-माळशेज घाट
 (०७) जुलै :- कर्जत, पवई तलाव, मायबोलीकर निरू यांचा फार्महाऊस (बदलापुर) येथील पावसाळी भटकंती
 (०८) ऑगस्ट :- औरंगाबाद - वेरूळ, अजिंठा लेणी, बिबि का मकबरा, सिंदखेडराजा, लोणार सरोवर
 (०९) सप्टेंबर :- सिंहगड, निळकंठेश्वर, आळंदी, वढु-तुळापुर
 (१०) ऑक्टोबर :- बहादुरगड (पेडगावचा किल्ला), सिद्धटेकचा सिद्धिविनायक, श्रीगोंदा
 (११) नोव्हेंबर :- सासवड भटकंती - मल्हारगड, भुलेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर
 (१२) डिसेंबर :- कोल्हापुर भटकंती:- नरसोबाची वाडी, रंकाळा, महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, सिद्धगिरी म्युझियम, पन्हाळा
 ___/\___ज्यांच्यासोबत यावर्षी मनसोक्त भटकंती करता आली त्या सर्वांचे मनापासुन आभार ___/\___

Happy आणि समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय झ्यॅक! हो नवीन वर्षा मध्ये अशीच सुखद भटकंती होऊ दे ( होऊ दे खर्च.:फिदी:) म्हणजे तेवढेच घर बसल्या नेत्रसुख पदरात पाडता येईल. सगळे फोटो अगदी कॅलेंडर टाईप अल्बम करावा असे प्रोफेशनल आलेत.

ते हिमाचल प्रदेशातले तळे किती नयनरम्य आहे!:स्मित:

क्या बात है! अगदी नेत्रसुखद आढावा आहे Happy
शुभेच्छांसाठी धन्यवाद आणि येत्या वर्षात अशीच मुशाफिरी होऊ दे ही तुलाही मनःपुर्वक शुभेच्छा Happy

अप्रतिम भटकंती आणि फोटो जिप्सी Happy ,
शंकराला जसा तिसरा डोळा आहे तसा तुम्हाला पण आहे, ज्यातून आम्ही जे बघू शकत नाही ते तुम्ही दाखवता, साधा दगड, सँडविच, सीताफळ, भंगलेली शिल्प, रस्ता , छत्री तुमच्या नजरेतून किती छान टिपली आणि आम्हाला दाखवली त्या बद्दल आभार. २०१६ सारखीच २०१७ ची भटकंती जोरदार होवो आणि आम्हाला पण ती पाहायला मिळो.
२०१७ च्या भटकंतीपूर्ण शुभेच्छा Happy

सुंदर आढावा.
तुलाही नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! २०१७ मध्येही तुझी भरपूर भटकंती होऊदे, आणि आम्हाला सुंदर
फोटोंची मेजवानी मिळू दे. Happy

अरे आमच्याकडे कोकणात जावुन ये रे... तुझ्या या कॅमेर्‍यातुन छान दिसेल कोकण>>>>>>>>>+११११११११११११११११११११११११११११११ Happy

अरे आमच्याकडे कोकणात जावुन ये रे... तुझ्या या कॅमेर्‍यातुन छान दिसेल कोकण>>>>>>:राग::अरेरे::दिवा: अरे नका रे नका जळवु प्लीsssssssssज! मागल्या वर्षी पहिल्यांदा समिंदर बघीतला आणी कोकणाच्या जाम प्रेमात पडले. आता २०१७ मध्ये एक कोकण ट्रिप करावीच लागेल.

पण भावना , तुमच्या कोकणाबद्दलच्या भावनेसाठी तुम्हाला भरपूर Modak_offered_to_Lord_Ganesh.jpg

मसतच भटकंती आणि सर्व फोटो!!

असेच यंदाही आम्हाला तुमच्या प्रकाशचित्रांमधून भरपूर भटकंती घडो!

रश्मी Happy खरच प्रेमात पडण्यासारखच आहे कोकण महाराष्ट्रातील लोकं केरळ ला वगैरे जाऊन येतात पण केरळपेक्षा भारी आपल्या जवळचं कोकण लोकांना दिसत नाहि.. आताश्या कळु लागलय बरीच लोकं येवु लागलीत कोकणात.. मी यंदा गणपतीला गेले होते.. राजस्थानी लोकांनी मिठाईची दुकानं थाटलीत बरीच कमाई करु लागलेत.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद
भावना, याच वर्षी कोकणात जायचं राहिलं
दरवर्षी एक फेरी होतेच त्याचे फोटो आहेत माबोवर

जिप्सी भाऊ ... अप्रतिम ... नेहमीसारखे .... आणि रश्मी ताई आणि भावना ताई तुमच्या प्रतिसादाला माझे अनुमोदन.... १००% ... आणि जिप्सी भाऊचे " कोकणमय " सदर ... तर अप्रतिम आविष्कार ... जिप्सी भाऊ ... जाऊन या ... आणि आम्हाला पण कोकण सफर घडऊन आणा प्रचि मधून....

Pages