मराठी गझल

गजल

Submitted by अनुराधा चव्हाण पाटील on 21 January, 2009 - 03:30

आता असे मन बावरे का धावते आहे?
पाहूनिया तुजला असे का नाचते आहे?

शरदातले हे चांदणे आले कसे येथे?
बाहेर तू होतीस आली वाटते आहे!

अंधारलेली रात्र आता रम्य का झाली?
की चांदण्यामध्ये तुझ्या ती नाहते आहे?

गुलमोहर: 

चूक..!

Submitted by मी अभिजीत on 20 January, 2009 - 08:21

कैफात चूक झाली, डोळे भरून आले.
"सैतान" ती म्हणाली, डोळे भरून आले.

टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या,
रचला कलंक भाली, डोळे भरून आले.

निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या
कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले.

गुलमोहर: 

मज कोण ऐकणारा?

Submitted by जो_एस on 12 January, 2009 - 10:35

जो सोबती फुलांच्या काट्यांस ठेवणारा
त्याला कसे कळावे हा बोचतो पहारा

ते फूल बोलले मग, थोडेच पण मुक्याने
आक्रंद हा मनाचा, हृदयीच लोपणारा

साऱ्यांस स्पर्श सुमनी, तो मखमली मुलायम
फुलपाखरू असो की, तो फूल तोडणारा

गुलमोहर: 

स्वप्न एखादे जणू...

Submitted by मिल्या on 12 January, 2009 - 02:10

चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले

गुलमोहर: 

पाश

Submitted by छाया देसाई on 12 January, 2009 - 01:54

पाश पाश सोडविताना गुंतलेच सारे
सोडता अभंगच बाकी भंगलेच सारे .

चक्रव्यूह लढवत गेले स्वप्न पूर्ततेला
परतणे न जाणत कळले संपलेच सारे .

अन्य रंग फासत माझे रंग हरवले मी
पाहता सभोती दिसले रंगलेच सारे .

सूर वेगळे हरती का भान वेगळ्यांचे
भान ना कुणाला येथे दंगलेच सारे .

खेळले जरी पत्त्यांशी मी न ती जुगारी
पान पान सरकत पडले बंगलेच सारे .

पंख लाभता जो उडता गाठताच उंची
भासते अम्हा का जग हे खंगलेच सारे .
छाया देसाई

गुलमोहर: 

पुन्हा एकदा

Submitted by सतीश वाघमारे on 8 January, 2009 - 13:23

तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
अंगावर ये तोच शहारा पुन्हा एकदा

आठवांतले कुठे मिळावे तिचे गाव ते
कोण मांडतो जुना पसारा पुन्हा एकदा

जेमतेम तो करारनामा पुरा वाचला
तोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा

गुलमोहर: 

वखतवेळ कुठला....

Submitted by जयन्ता५२ on 3 January, 2009 - 05:34

वखत वेळ कुठला विसरती माणसे
बघत खेळ कसला गुंगती माणसे

तो जरी हारला, मी जरी जिंकलो
नाव त्याचेच का घोकती माणसे?

तीच ती भांडणे,त्याच त्या कारणे
बदलते शस्त्र, ना बदलती माणसे

आवई प्रलयाची उठविते कुणी
सावली सोडुनी धावती माणसे

गुलमोहर: 

प्राक्तन

Submitted by संदीप चित्रे on 28 December, 2008 - 23:40

गझलेची कार्यशाळा झाल्यानंतर, गझल लिहिण्याचा, हा माझा अजून एक प्रयत्न !!!
प्रथम गझल कार्यशाळाचालकांचे मनःपूर्वक आभार मानतो. 'गझल' लिहिण्यातली गोडी आत्ता कुठे हळू हळू कळायला लागलीय Happy ... बाकी गझल इथे देत आहेच, चूभूदेघे !!
स्नेहांकित,

गुलमोहर: 

आता..!

Submitted by मी अभिजीत on 12 December, 2008 - 02:23

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येईना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले

गुलमोहर: 

नको आता

Submitted by सतीश वाघमारे on 5 December, 2008 - 14:13

( रदीफ तोच ठेवून 'जमिनी'त थोडा फेरफार करुन केलेल्या दोन रचना आपल्या आस्वादार्थ सादर करत आहे.)

वाट इतकी पाहणे- नको आता
स्वप्नातही जागणे- नको आता

बासरी ती चालली मथूरेला
गोकुळी ह्या थांबणे नको आता

पानगळ ही पाहणे साहवेना

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल