Submitted by कौतुक शिरोडकर on 23 October, 2008 - 00:46
गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच
लोचनी तिच्या सदैव
पाहतो नवेच पेच
वागतो किती जपून
लागते मधेच ठेच
घेतली न मी उगाच
बोलतो अता खरेच
नेमकी फुले गहाळ
पाकळ्या हळूच वेच
भार फार नियमनात
बोलतात आकडेच
काय लढवशी गडास
जर फितूर आतलेच
चेहरे तसे नवीन
चर्म, कर्म, धर्म तेच
डाव खेळती जुनाच
यास पाड, त्यास खेच
चार यार जोडलेत
भार वाहतील तेच
चल चहाच सांग दोन
परवडे खिशास हेच
गुलमोहर:
शेअर करा
व्वा!!!!!!!
व्वा!!!!!!! क्या बात है! सोप्या शब्दात बरंच काही सांगितलंय...मस्त!!! आणी एक छान ठेक्यात वाचता येते कविता..:)
सुंदर!
पाकळ्या
पाकळ्या आणि चहा हे शेर फार आवडले! कौतुक, छान लिहितोस!!
चेहरे आणि
चेहरे आणि चहा खूप आवडले... कौतुक मस्त
कौतुक जरा जागा सोडा ना दोन शेरांमध्ये म्हणजे वाचायला मजा येईल
================
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली