एकच उद्देश
लगबग पुढे जातांना तुला ओलांडण्याचा आवेश नव्हता..
तुझ्या समोरील मार्ग सुकर करणे हा एकच उद्देश होता
दारावर ठोठावतांना तुझ्या, व्यत्यय करण्याचा मानस नव्हता..
एकाकी तर नाहीस ना तू, ही खात्री करणे हा एकच उद्देश होता
लगबग पुढे जातांना तुला ओलांडण्याचा आवेश नव्हता..
तुझ्या समोरील मार्ग सुकर करणे हा एकच उद्देश होता
दारावर ठोठावतांना तुझ्या, व्यत्यय करण्याचा मानस नव्हता..
एकाकी तर नाहीस ना तू, ही खात्री करणे हा एकच उद्देश होता
हात हा हातात कोणी घेत नाही
मागतो आधार कोणी देत नाही
रात माझी सरत का नाही कधीही?
सूर्य कां गावात माझ्या येत नाही?
भागली नाहीच तृष्णा काल माझी
काय दोस्ता,आज काही बेत नाही?
काळही नुसतीच वचने देत जातो
संगती नेतो म्हणे पण नेत नाही
नेहमीच शब्द-कोडी, सुटतील काय मित्रा?
नेहमीच रिक्त जागा, भरतील काय मित्रा?
सजली जरी जुनी ती, मैफील आज पुन्हा,
दर्दी तसे समोरी,.. असतील काय मित्रा?
झुकवून मान वेड्या, आहेस तू कधीचा..;
धाडस करतोय खरा, पण मला खरंच नाही सांगता येत या रचनेला गझल म्हणता येइल की नाही ते.
गुरुजनच ठरवतील.
मला सांग आभाळ फाटले किती ?
तुझे ही अश्रू आज आटले किती ?
दिशाहीन वारे फोफावले असे
दिशांनीच वार्याला छाटले किती ?
स्वप्नदेशातून आले साथ देण्या सूर हे
ऐकुनी माझे तराणे लाजणे तव चूर हे
पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा
स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे?
रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे?
लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे
हातच्या रेषा, कपाळी कोरलेले लपवतो...
ग्लास हाती, त्यात सारे दु:ख माझे बुडवतो!
संकटे येतात चोहीकडुन मी भांबावतो...
अन् करायाला नको ते करुन मग पस्तावतो!
घात करणे जीवनाचा नियम झालासे जणू,
दूध देणार्यास अक्सर साप उलटुन चावतो!
क्षणभंगुर हे जीवन सारे, क्षणभंगुर ही काया!
सब मिथ्या है, सब झूठा है, सब ईश्वर की माया!
चाळत होतो जुनी डायरी, कुठे कसा मी फसलो,
सोचने लगा; अबतक मैने क्या खोया, क्या पाया!
थिजलो, विझलो, राख जाहली, पुन्हा उडालो गगनी,
बोलायाला मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी नाही
जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही
मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
ज्या मनात वसते माया, त्या मनात असते आई!
ते घर नंदनवन बनते, ज्या घरात असते आई!
लेकुरवाळी नसताना, परक्याचा पाहुन तान्हा..
ज्या उरास फुटतो पान्हा, त्या उरात असते आई!
ती निरांजने डोळ्यांची फिरतात पाडसाभवती,
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी!
साजना याद तुझी त्यात झुरायासाठी!
ह्रदयावर तुझिया कडक पहारा भलता,
सांग मी काय करू आत शिरायासाठी?
तू म्हणालास मला, "विसर साजने आता",
रोज जपते मी तुझे नाम स्मरायासाठी!
एक नाजुकसा आघात मनावर झाला