अति सूक्ष्म कविता

Submitted by Kiran.. on 13 October, 2011 - 11:02

खोलवर विचार केलास तू.....>> म्ह्हं..... तु आज विचार करायला भाग पाडलेस मित्रा.....इतका भयंकर प्रसंग इतका सुक्ष्मरित्या मांडलास्...व्वा!! तुझ्या कवितेतील विचारांना सलाम....आणि इतक्या गहनतेने प्रतिसाद वाचुन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

आणि या सुक्ष्म अशा महान कवितेला.....मनापासुन शुभेच्छा!!

व 'अभिनंदन'!!!

ही कविता कुठय? मला तर कविता दीसतच नाहिये. मला तर हा एक महान ग्रंथ वाटतोय. समुद्रापेक्षा, सुर्या पेक्षा मोठे सत्य आज तुम्हि एका सुक्ष्म बिंदूत बंदिस्त केलय.
लाखो, करोडो मैलांवरुन पॄथ्वी देखिल एक सुक्ष्म बिंदूच दिसते तेथे आपले आयुष्य काय हेच सुचवायच ना तुम्हाला? आअहा किति महान आपल sorry सुक्ष्म विचार

सॅको

तुमचं एक पाऊल पुढे पडतंय.. यू आर ऑन राईट ट्रॅक

निरीश्ववरवादाच्या सचेत चिंतनानंतर सदसदविवेकबुद्धीने विश्वारंभाच्या आदिअंताच्या परिघाच्या फे-यात राहून मोक्षादि कल्पनांना बाजूस सारून विचार केला असता सृजनशील मनास बुद्धीचे जसजसे आकलन होत जावे तद्वतच मिथ्यावादाच्या भौतिकवादविरोधी कल्पना प्रतिभेचा ताबा घेत जातात . त्या तिथे सूक्ष्मादिसूक्ष्म बिंदूशिवाय काहीच दिसत नाही. आदिही नाही नि अंतही नाही अशी त्रिकालव्यापी कालरहीत अशी अस्तित्वहीन अवस्था जाणवते तेव्हा त्या दिव्यानुभावाने जे काही स्फुरलं ते उस्फूर्तपणे लिहीत गेलो लिहीत गेलो आणि सूक्ष्मात सामावत गेलो...

त्या दिव्यानुभावाने जे काही स्फुरलं ते उस्फूर्तपणे लिहीत गेलो लिहीत गेलो आणि सूक्ष्मात सामावत गेलो... >>> कृष्णविवरांत. बरोबर ना..?

व्वा!! व्वा!!

भू भूं ची व्यथा काळजाचा ठोका चुकवून गेली... डाव्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या !!>>>>
अति सूक्ष्म कविता लिहून डोळा दुखत असेल.

मला असे वाटते की सृष्टीच्या स्थापकत्वाचा जर आपण विचार केला तर कोणत्याही एका बिंदूमधून निर्माण होणारी प्रक्रीया ही त्या प्रक्रियेतूनच तयार होणारी उर्जा वापरत आपल्या गतिमानशीलतेला अधिक गतिमान करत जाते. आणि ही गतिमानता एका संपृत्कावस्थेकडे वाटचाल करू लागते त्यावेळी मग आपण म्हणता तशी त्रिकालव्यापी कालरहीत अशी अस्तित्वहीन अवस्था दृगोच्चर होते.
आपल्या स्थूलातून सूक्ष्मात जाण्याची जी प्रक्रिया आहे तिला आपण दिव्यानुभव असे म्हणता आहात. परंतु जाणिवांच्या पातळीला भेदून निघालेली ही एक अमर्याद उर्जा इतकेच तिचे स्वरुप असावे असे मला तरी वाटते.

तुमचे यावरचे विचारमंथन वाचायला आवडेल

निरीश्ववरवादाच्या सचेत चिंतनानंतर सदसदविवेकबुद्धीने विश्वारंभाच्या आदिअंताच्या परिघाच्या फे-यात राहून मोक्षादि कल्पनांना बाजूस सारून विचार केला असता सृजनशील मनास बुद्धीचे जसजसे आकलन होत जावे तद्वतच मिथ्यावादाच्या भौतिकवादविरोधी कल्पना प्रतिभेचा ताबा घेत जातात . त्या तिथे सूक्ष्मादिसूक्ष्म बिंदूशिवाय काहीच दिसत नाही. आदिही नाही नि अंतही नाही अशी त्रिकालव्यापी कालरहीत अशी अस्तित्वहीन अवस्था जाणवते तेव्हा त्या दिव्यानुभावाने जे काही स्फुरलं ते उस्फूर्तपणे लिहीत गेलो लिहीत गेलो आणि सूक्ष्मात सामावत गेलो...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> _____________/\_____________

Lol

कवितेची रसग्रहणं आवडली...

किरण्यके :). मी बराच वेळ माझ्या लॅपटॉप ची स्क्रीन पुसण्याचा प्रयत्न केला तेथे काहीतरी लागले आहे असे समजून.

किरण... यापेक्षा सूक्ष्मात गेले पाहिजे, ब्रम्हांडाच्या मूळापाशी, विश्वाच्या ऊगमापाशी...
मग तिथून इथे कॉपी पेस्ट करायचे महान कार्यही आपल्यालाच करावे लागणार आहे !

. .. ... .. .. . .... ..... .. .... .. ... .. ... .. ..

मॉर्स कोड हा अतिसूक्ष्मातून निर्माण होणार्या आधिभौतिकाचं प्रतिक म्हणता येईल काय?

काय महान रे...
मला वाटत होते माझ्याच कविता लहान लहान असत्तत
हे म्हणजे अतिच...

पण फार फार आवडली ही कविता.. पाणी आले रे डोळ्यात माझ्या Sad
किती तरी विचार दाटले रे मनामधे

पूढचे भाग (सिक्वेल्स) पण येउ देत लवकर लवकर Biggrin

आजपर्यंत मायबोलीवरील सर्वात जास्त आवडलेली कविता! Proud गहन विचार करण्यास भाग पाडणारी!

तसं पाहिलं तर मानवाचं मन हे एका केंद्रबिंदूपासूनच सुरु होतं (जन्म झाल्यावर), जसंजसं वेगवेगळ्या गोष्टी, अनुभव मिळत जातात तसं तसं ह्या केंद्रबिंदूपासून तयार होणार्‍या वर्तुळाचा परीघ रुंदावत जातो, कक्षा वाढत जातात, जाणिवा विस्तारत जातात! पण मूळ हे केंद्रातच, केंद्रबिंदूच नसेल तर वर्तुळाचे अस्तित्व नाही.

ज्याप्रमाणे शांत पाण्यात एखादा खडा टाकला तर त्या बिंदूपासून तरंग उठत पसरत जातात, तसंच आपल्या मनात उठणारे नानाविध भावतरंग पण एका बिंदूपासूनच निर्माण होतात. कवीने बिंदूची महती किती सूक्ष्मपणे मांडलीय यातच कवीचा हातखंडा (हात(भट्टीचा)खंबा) दिसून येतो.

हे माझे रसग्रहण झाले, कविता आवडली. (का कोण जाणे बिंदूमाधव यांची आठवण झाली या निमित्ताने!)

सूक्ष्मानुभाव पंथाचे जनक म्हणून आपले नाव मायबोलीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.

आता माझ्या विचारांच्या गाडीला बिंदू लावतो. (म्हणजे फुलस्टॉप.)

खारक्या, तुझ्यात उत्तम समीक्षक दडला आहे, हे माझ्या सूक्ष्मदृष्टीला आत्ताच जाणवलंय!!! Wink

>>> कवी "सूक्ष्मानुभाव" पंथाचे आद्यप्रवर्तक आहेत..... >>> क्या डायलॉग है ? माफ करा मी मराठीचा वापर करायला हवा. काय विचार आहेत आपले ?

धन्यवाद नितिनचंद्र...... माझ्या डायलॉगची सुक्ष्म दखल आपण घेतलीत आणि या सूक्ष्मजीवाच्या अंगी हत्तीचं बळ आलं.... !!!!! Proud

खारीक यांनी सुक्ष्मातीत रसग्रहण करून आपण "सुक्ष्मानुभाव पंथाचे" सुक्ष्मोत्तम आय मिन... शिष्योत्तम व्हायला योग्य आहात हे दाखवून दिलेत... !!!!! Wink

रच्याक, ही कविता प्रसवताना किती सूक्ष्मकळा आल्या असतील नै किरण्यकेंना.... Rofl Wink

Pages