जनी वंद्य ते सर्व धुडकावतो मी...
जगावेगळे मागणे मागतो मी.
टग्यासारखे हे जरी बाल्य गेले...
सिगारेट फ़ुंकीत उंडारतो मी
उकळता-मिळविता कधी चार पैसे
अपेक्षा नि कर्तव्य झिडकारतो मी
जरा शिंग फ़ुटता, जरा ’स्पेस’ मिळता
निती-मूल्य बसणात गुंडाळतो मी
गटागट रिचवितो उभा एक खंबा
सुगंधी मना रोज चुरगाळतो मी
-सुप्रिया.
चांदणे आहे खरे की भास नुसता
कालची आहे तळी की वास नुसता
टाकतो त्यांच्या वतीने रोज रात्री
एकटेच रिचवण्याचा त्रास नुसता
हो मलाही धावण्याचा छंद आहे
श्वान जे मागे दिसे आभास नुसता
वाटते द्यावा घश्याला शेक त्याचा
पण कपाळी आमच्या थर्मास नुसता
हात दोन्ही जोडती माझ्यासमोरी
बैसता मी बापडा गाण्यास नुसता
टिम इंडीयाने खरे म्हणजे
टिम अण्णांपासून शिकावे
प्रबळ इच्छाशक्तीने
साहेबांशी नडावे
सचिननेही सहजतेने
शंभरावे शतक करावे
पण काहीही असो सर्वांनी
पाचही दिवस खेळावे
ओवल वरील आजपासून सुरु होणार्या भारत इंग्लन्ड यांच्यातील अंतीम कसोटी सामन्यास भारतीय संघास शुभेच्छा
अमोल केळकर
--------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
असंख्य आशा अजून वंचित आहेत
तुझ्या आश्वासक हास्याला
त्यांना दिलासा द्यायला विसरू नकोस!
असंख्य वेदना अजून वंचित आहेत
तुझ्या हळूवार फुंकरीला
त्यांना नीट जपायला विसरू नकोस!
असंख्य नजरा अजून वंचित आहेत
तुझ्या मोहक दर्शनाला
त्यांना तृप्त करायला विसरू नकोस!
असंख्य द्वारे अजून वंचित आहेत
तुझ्या सोनपावली प्रवेशाला
दारातलं माप ओलांडायला विसरू नकोस!
असंख्य रात्री अजून वंचित आहेत
तुझ्या उबदार स्पर्शाला
येशील तेव्हा गजरा माळायला विसरू नकोस!
------------------टोकू:)
.
गाल तोच लाल-लाल भावलाय कालचा
डास का पुन्हा तिथेच चावलाय कालचा ?
उर्वशी नि मेनकाच भासती तुझ्या सख्या..
’तू’ निमित्त !...घोळकाच भावलाय कालचा
रोज-रोज बदलतेस पेहराव नव-नवे...
ड्रेस ज्यात, देह तोच मावलाय कालचा
लग्न-बिग्न लांबचे, किती-किती तुझ्या त-हा...
एक बापुडा उगाच कावलाय कालचा
’बंधुराज’ थेटरात गाठतीच नेमके...
पाहता तुझ्या समीप,धावलाय कालचा
जिव मुठीत घेउनीच धावलो नि वाचलो
मारुतीच पामरास पावलाय कालचा
-सुप्रिया.
सरकार एके सरकार
सरकार दुणे महागाई फार
सरकार त्रिक उपासमार
सरकार चोक भ्रष्टाचार
सरकार पाचा अंध:कार
सरकार साही आतंक फार
सरकार साते बॉम्बस्फोट थरार
सरकार आठे हाहाकार
सरकार नव्वे कसाब अवतार
सरकार दाही बेकार ... सरकार दाही बेकार
.. हाकलण्या सरकारला या
हवेत `अण्णा' लक्ष लक्ष हजार
हवेत `अण्णा' लक्ष लक्ष हजार
प्रेम म्हणजे.........
तूझ्या माझ्यातल अंतर संपल्यानंतर .....................
......... .............................. तूझ्या माझ्या मनात उरेल ते
अवघे आयुष्य एकत्र घालवूनही..........................
.................................... जरा नजरे आड होता झूरेल ते
प्रेम म्हणजे.........
सुकलेल्या फूलामधून आठवणींचा गंध घेताना ..............
........................... आत्म्यातूनही इथल्या हवेत तरेल ते
अन युगेनयुगे पानांच्या सळसळीतून ..........................
............................आसवांच्या सोबतीने हुंदक्यांनी भरेल ते
प्रणयगीत न सुचे मजला
प्रणयगीत न सुचे मजला
कसला सुदिन आज उगवला
जयघोष घुमे अंबरात जय भारत
जय भारत स्वातंत्रदिन आज प्रगटला....
राणी लक्ष्मीबाई होती लढली
पुत्रास घालुनी आपुल्या पाठी
केवळ वंदे मातरम म्हणण्यासाठी
त्यांनी पाठीवर झेलली काठी...
आम्हा आज कळेना किंमत
भोगतो हे स्वातंत्र अलबत..
पण क्षणभर तरी त्यांना स्मरा
करु प्रणाम त्या अनाम वीरां...
गातो खुशाल प्रणयगीत आम्ही
पण भोगत होते ते काळापाणी
ऐकताच त्यांची दिव्य कहाणी
शहारे अंग डोळ्यात येई पाणी....
रक्ताचा शिंपुन सडा भूवरी
स्वातंत्र्याचे मांगल्य आणिले दारी..
ना भय, ना होती कसली आस
बर्याच वेळा असं
घडतं कधी कधी
मी साद घालते तिला
पण वेडी रुसुन बसते
शहाण्यासारखी..
मी तिची कशीतरी,कितीतरी
मनधरणी करते,विनवण्या करते..
पण शहाणी माझ्याशी
हसत सुद्धा नाही....
निघुन जते दुरवर..पार दुरवर..
हरवल्यासरखी वाटते
कदाचित हरवते ही..!
मग मी तिची आस सोड्ते..
डोळ्यातुन खळकन पाणी वाहुन जातं..
वाटतं कायमची तर सोडुन गेली नाही ना?
वाटतं ती मला पार विसरली
आता आपला ॠणानुबंध संपला
कानफटभर नाद घुमला खास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता
कार्ड पैसे चेक ठेवा पर्समध्ये
सोबतीला बैल न्या बोजास नुसता
गळसरी त्यांची सुवर्णी माखलेली
एकटा काळा मणी नावास नुसता
का असे डोळे वटारून पाहते ती
"हाड" वदलो सासरी श्वानास नुसता
भांडता ती झोपण्याचे सोंग घे तू
चादरीखालून गुपचुप हास नुसता
काय खाऊ कागदाचे चंद्र तारे
सोड कविता जात जा कामास नुसता
आठ दिस गेले वरी काही कळेना
हात त्याचा लागला हातास नुसता
छापल्या 'नुसत्याच' या इतक्या जणांनी
वाचण्याचा जाच नुसता त्रास नुसता