काहीच्या काही कविता

प्रयत्नशिल

Submitted by pseudorandom on 30 September, 2011 - 14:29

कितिहि वेळ सोबत असलिस तरि अजुन कहि वेळ तु सोबत असाविस अस वाटत,
आमच्या हावरटपनाच for loop हे नेहमिच infinity मध्ये असत,
तुला वेळ नसेल वाचन्यास म्हनुन स्वतहाशिच बोलतोय,
कदाचित तुहि वाचशिल कधितरि जानुन तुलाहि cc मध्ये ठेवतोय!

छळ

Submitted by pseudorandom on 30 September, 2011 - 14:16

रोज रात्रि झोपतना तुला दिवसभरात किति छ्ळल याचा आलेख डोळ्यासमोर येतो,
त्या छळातल्या तुला वेगळ करे पर्यन्त सकळचा गजर सुरु झालेला असतो!

धुसर

Submitted by ट्यागो on 29 September, 2011 - 12:08

माझ्या निशाचर डोळ्यांत
तुझे मोहक स्वप्न
पिसाहून हलकेसे
अलगद निद्राधीन होण्याधी
स्वर्गाच्या कमानीसारखे मोहवलेले

हळुहळू सगळंच धुसर
तू सोडून!

मयूरेश चव्हाण, मुंबई.
२६.०९.२०११, २३.२८.

का वळा ?

Submitted by UlhasBhide on 26 September, 2011 - 03:00

या वर्षातले फक्त दोनच दिवस डिमांडचे उरले यांचे .....
नंतर एकदम पुढच्या वर्षी.

Kawala-ed.JPG

हा कोणता काव्यप्रकार बरे? काव्यप्रकार सुचवा.

Submitted by अभय आर्वीकर on 24 September, 2011 - 12:02

लग्न झाले २२ मे
पहिली मुलगी २३ मे
दुसरा मुलगा २४ मे
तिसरा मुलगा २५ मे
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
वर्ष वेगवेगळी आहेत बरं का!

--------------------------------------------

परतीचा पाउस

Submitted by वर्षा_म on 22 September, 2011 - 05:29

सकाळच्या बातम्यांमधे सांगितलं
मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला

गेले चार महिने तुझ्या सोबतीत
कसे गेले कळलेच नाही

मृदगंधाने बेभान केलंस
पहिल्या सरीने चिंब केलंस

कधी रिपरीप तर कधी मुसळधार
भाळलोय तुझ्या प्रत्येक रुपाला

आमच्यासह फुलवलेस धरणी मातेला
वर्षभराची तयारी करुन निघालास

अच्छा टाटा करायलाही
हात उचलत नाहीये!

ओढ..

Submitted by के अंजली on 22 September, 2011 - 04:32

डांबरावरुन.. सडकेवरुन.. रस्त्यावरुन..
सिमेंटच्या जंगलातून.. फरशीवरुन..कोब्यावरुन..
चकचकीत..गुळगुळीत..सुंदर सुंदर टाईल्सवरुन..
चपलातून.. बुटातून.. नाजूक नक्षीकामाच्या..
महागड्या सपातातून..
फिरणार्‍या माझ्या पावलांना..

तीव्र ओढ लागलीये..

खडबडीत खडकांची..
मऊशार काळ्या मातीची..
सळसळत्या सोनेरी वाळूची..
दवभिजल्या मखमली ओल्या गवताची..
झुळझुळत्या पाण्याची..
हळूच स्पर्शणार्‍या लाटेची...!!

वेडी म्हणताय..?

वाटलच होतं...

चुकीचे मोबाईल रिचार्ज

Submitted by पाषाणभेद on 20 September, 2011 - 19:31

चुकीचे मोबाईल रिचार्ज

गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात
तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात

गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता
याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता

गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे
कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे

कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला
अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल झाला

मनापासून प्रेम होते त्याचे गिट्टीवर
ती न भेटली तर जीव होई खालीवर

इकडे गट्टूच्या बापाने त्याला घराबाहेर काढला

शब्दखुणा: 

प्रेमगीत

Submitted by -शाम on 20 September, 2011 - 00:23

कधी ना कधी तू भेटण्यास येशील
आजवरी जपलेले उधळून देशील...

धरतीस भेटण्याला झुकते आभाळ खाली
मी वाट पाहिली तशी, उद्या तू पहाशील...

रुसवा कशास खोटा करीते उगाच आता
येशील मिठीत तेंव्हा तू अधीर होशील...

स्वप्नात येऊनिया छळले मला कितीदा
स्वप्नी तुझ्या मी येता सांग कुठे जाशील...

माझ्याविना सखे तुझे जगणे उदासवाणे
ये संगतीत माझ्या प्रेमगीत गाशील...

.......................................................शाम

..अद्वैत..

Submitted by सारीका on 19 September, 2011 - 13:23

स्वप्नात कुणीसं यावं,
जागं होताना दिसावं
तसा आलास; आरपार..
कुशीत शिरताना लहानुला होऊन गेलास..
मातृत्वाच्या सरीत भिजले काहीकाळ..
क्षण गहिवरले,
म्हणालास
खुप देऊ खुप घेऊ
अद्वैत..

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता