चापट गालाले लागते

Submitted by जीएस on 26 November, 2011 - 10:16

या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा.

[चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.]

त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते

साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते
साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते
साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

जमीन कोनाची असते, जमीन कोनाची दिसते
साहेब भूखंड गिळते, विळखा पुन्याले पडते \\३\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

'दोस्त' दुबैत राहते, हैवान देशात सोडिते
हैवान फटाके फोडिते, साहेब विमान धाडिते \\४\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

नारको चाचणी बोलते, ष्टांप साहेब छापते
तेलगी जेलात सडते, साहेब तिजोरी भरते \\५\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फक्त एकच' इचारते \\६\\

त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते..

सुंदर..

शॉर्ट अँड स्विट बायोग्राफी ऑफ साहेब.

कैच्या कैच भारी लिहिले साहेब आपण. ब-याच काळाने लिहिले आणि तेही एकदम फर्मास.

जबरी विडंबन आहे! साहेबांचे अगदी यथार्थ वर्णन!! वाचून बहुत मझा आला!!! खालील ओळी जास्त आवडल्या.

नारको चाचणी बोलते, ष्टांप साहेब छापते
तेलगी जेलात सडते, साहेब तिजोरी भरते \\५\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फकस्त एकच' इचारते \\६\\

आव्हाड पेटून ऊ ठ ते, नाटकी प णा क र ते,
अण्णांवर चि ड ते, "अण्णा नथुराम" बो ल ते \\७\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

सही,
donald-duck-022007-3.gif

"आधुनिक झेन्डुची फुले" मधिल उत्तम-तम कविता. जरी "थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते" घटना थोडिशी असभ्य तरीही कवितेत ह्या घटनेचे समर्थन नसल्याने विडम्बन मूल्य वादातीत आहे.

Pages