तुझी आसवे
तुझी आसवे वंद्य थोर पावसाला
ना कुठला रुतूही कसा वर्ज्य त्यांना,
बरसायला?
ना वीजेची आरास ना करडे आभाळ
कंठी हलकी एकच कळ
मुक्त मोकळे व्हावे जळ
नजर जराशी वळती खाली
मुक तुझे अन् जलबिंदू
मेघांहूनही अलगद होत
वदले अधर तव नयनांना
तुझी आसवे वंद्य थोर पावसाला
ना कुठला रुतूही कसा वर्ज्य त्यांना,
बरसायला?
ना वीजेची आरास ना करडे आभाळ
कंठी हलकी एकच कळ
मुक्त मोकळे व्हावे जळ
नजर जराशी वळती खाली
मुक तुझे अन् जलबिंदू
मेघांहूनही अलगद होत
वदले अधर तव नयनांना
पाऊस म्हणजे...
पाऊस म्हणजे कोंदलेलं निळेपण
गोर्या विजूने भारला, घनघन श्यामघन
पाऊस म्हणजे गाली टिचकीची खूण
मग मोतिया शिंपण, हरखून हरखून
पाऊस म्हणजे ओली मेंदी, ओले मन,
अन भिजण्या, ओढून संगे नेलेला साजण
दु:खाचा आला महापूर
बांधच फुटले सर्व
दु:खच लागले बुडायला......
आला दु:खाचा करुण शेवट
शेवटच्या क्षणी
आर्त स्वरात....
फाशी जाणा-या कैद्याच्या
शेवटच्या इच्छेप्रमाणे...
दु:खाने सांगितले तिला....
आता तरी ....
माझ्या मरणावर गाळ
आनन्दाच्या ठावठिकाणा विचारता
लोकान्नी मला तुझा पत्ता दिला
आणि माझ्या हर्षित मनाने
दारी तुझ्या पारीजात सान्डला //
तुझ्या घरावरून आलेला वारा जेव्हा
तुझी खुशाली सान्गू लागला
तेव्हा तो वारा उनाड न वाटता
स्वप्नातिल मूर्त इच्छांना
अस्तित्वातील शिल्प मिळू दे
हे देवा मला लवकर
छानशी बायको मिळु दे
तारुण्याच्या या खळखळत्या प्रवाहाचा
आता सरीतेशी संगम होवू दे
अन् आयुष्याच्या सागरा मधे
माझ्या सोबत यथेच्च बागडणारी
ह्या इथे मी बेसलो
तनहा असा दीवाना
चहु दिशास पहातो आहे
माणुस गर्दीचा नजारा...
होता ज्यास गंध
सुगंधी अत्तराचा
तो दिल आताशा
झालाय फत्तराचा.....
काय मी केली होती
निर्णयाची घाई
कि मजला गाठते
गर्दीतही तनहाई....
तुम्ही तरी जाउ नका
अनपेक्षित आगमनाने वरुणाच्या जाहली हर्षभरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा
तिच्या पदराशी वारा खेळला
मंद मृद्गंध दरवळला
लखलखुन कडाडत्या विजेने बावरली वसुंधरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा
झरझर झरझर आल्या धारा
आसमंती बहरला शहारा
स्पर्शात प्रियाच्या देह निथळला लाजली वसुंधरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा
दिशा भिजल्या क्षितिजही भिजले
तिचे गुपित सार्यांना समजले
धुंद आवेगात पर्जन्यराजाच्या भिजली वसुंधरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा
न्यूटनचा तिसरा नियम हा
प्रेमाला दरवेळी लागू नसतो,
एकिकडून दिलेल्या सादाला
पलीकडून प्रत्येकवेळी तेवढाच प्रतिसाद नसतो //
अशावेळी न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार
पलीकडच्याची स्थिती नकारातून होकारात
कधी काळजाचा तुझ्या ठाव होते,
कधी पैलतीरी उभी नाव होते ।
कधी निग्रही मौन, केव्हां दुरावा,
कधी आर्जवी लीनसा भाव होते ।
कधी जीत उन्मत्त द्वंद्वातली, तर
कधी हारला पूर्ण पाडाव होते ।
कधी तृप्त मौनातला शब्द होते,
सावल्यांचे कोवळे मृगजळही
हसते देउन भासांचा दाखला
कधी सत्य, तर कधी कल्पित
भासतो चांदण्यांचा काफ़ला
अंधारातही मी एकलाच हींडतो
सखे, शाप हा माझ्या पथाला
तुझ्यात गुंतलो, तेव्हाच चकलो
अद्याप शोधितो मी स्वत:ला