दु:खाश्रू.....

Submitted by kalpana_053 on 27 February, 2008 - 18:39

दु:खाचा आला महापूर
बांधच फुटले सर्व
दु:खच लागले बुडायला......
आला दु:खाचा करुण शेवट
शेवटच्या क्षणी
आर्त स्वरात....
फाशी जाणा-या कैद्याच्या
शेवटच्या इच्छेप्रमाणे...
दु:खाने सांगितले तिला....
आता तरी ....
माझ्या मरणावर गाळ
एक आनंदाश्रू....
जो देईल मला सदगती....
तुझा पुढील जन्मात
बनण्यासाठी.....
एक आनंदाश्रू.....

सौ. कल्पना धर्माधिकारी.....

गुलमोहर: