कविता

खुळी

Submitted by सारंग on 9 March, 2008 - 03:10

उगाच कोणी सांगत बसते काहीबाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही

असाच माझा जरा वेंधळा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

गुलमोहर: 

आठवण

Submitted by naik_ashish on 8 March, 2008 - 01:11

....कितितरि स्वप्न अपुर्ण आहेत अजुन......
तरिसुद्धा नेहमि तुझिच आठवण का येते आहे....?
....कस॑ बसलय हे प्रेम तुझ्यावर.....
क्षणाक्षणाला वाढतच का जाते आहे....?
....जितकि दुर आहेस तु माझ्यापासुन.....

गुलमोहर: 

आपण कुठे हरवलो का...

Submitted by punekarp on 6 March, 2008 - 03:59

श्वासातला मोहोर,
स्पर्शातलं वादळ,
भावनेचा कल्लोळ,
सगळंच आता विसरलो का
आपण कुठे हरवलो का.....

तुझी वाट, माझी वाट,
तुझं जग, माझं जग,
तुझी स्वप्नं, माझी स्वप्नं,
सगळं आहे जवळचं तरि
आपण कुठे हरवलो का.....

मुलांचं संगोपन,

गुलमोहर: 

तो आणि ती

Submitted by VivekTatke on 5 March, 2008 - 09:39

जलधारांनी आपादमस्तक चिंब न्हाऊन निघालेला तो
नि अशा मुसळधार पावसात सुद्धा जराही न भिजलेली ती //

तो बोलतोय्-मनापासून जीव तोडून ,कंठ शुष्क होईतोपर्यंत
नि तिचे कान ऐकत आहेत--पण ती ऐकत नाही आहे //

गुलमोहर: 

श्वास

Submitted by VivekTatke on 5 March, 2008 - 09:32

माणसाचं असणं नि नसणं
यामध्ये असतो फक्त एक धागा
जनन नि मरण या दोन टोकांच्यामध्ये
झुलणारा अधांतरी धागा //

अगणित श्वासामध्ये एक श्वास
अकल्पित, अगम्य हाताने रोखला जातो
नि जे तुम्ही आत्ता असतात
श्री. वा सौ., कुमार वा कुमारी

गुलमोहर: 

चित्रं

Submitted by देवा on 5 March, 2008 - 04:07

बरीच वर्षं झाली
ते चित्र माळ्यावर पडून होतं
खुप आपुलकीने रंग भरले होते त्यात,
आकाशाचे खुलेपण
सरोवराची शांतता
जमिनीची ममता
अगदी भरून राहिली होती चित्रात
पण घराच्या आधुनिक भिंतीवर
जरा वेगळं वाटायला लागलं
त्याचं ते असणं

गुलमोहर: 

प्रेमाचा हिशोब

Submitted by सुमेधा आदवडे on 5 March, 2008 - 00:26

कधी ऐक जरा फुलपाखराचा फुलासंगे झालेला संवाद
त्याच्या छान ताज्या द्रवमिश्रीत रंगांचा अल्हाद
मग कळेल तुला माझ्या मनाला लागलेला नाद

कधी पहा जरा क्षितीजावरचे लाल-केशरी आकाश
जमिनीत विरणार्‍या सुर्याचा तेजोमय लख्ख प्रकाश

गुलमोहर: 

शिवबाचा भगवा

Submitted by VivekTatke on 4 March, 2008 - 12:02

रातीच्या मिट्ट अंधाराला घाबरायच नायं
कंस-रावणाच्या दंडुक्याला आता भायच नायं
कारण आता गडावर शिवबाचा भगवा डौलत हायं //

बाईच्या लाजेला आता दुष्ट लांडग्यांची तमा नायं
नि कल्याणच्या सुनेसारखं बायांना मानाच स्थान हाय

गुलमोहर: 

अन्याय

Submitted by coolKetan on 4 March, 2008 - 04:22

ह्याची त्याची तुझी माझी अशी
प्रत्येकाने एक जमवायची गोष्ट
मग सोयीस्कर पणे चुकून चुकवून
किंवा वाटून, वाटवून घ्यायची तीच गोष्ट

एकेक कोपरा पुरतो प्रत्येकाला मग
जेवढे कोपरे तेवढेच धागे का तेवढेच पैलू (?)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता