न्यूटन आणि प्रेम

Submitted by VivekTatke on 26 February, 2008 - 11:17

न्यूटनचा तिसरा नियम हा
प्रेमाला दरवेळी लागू नसतो,
एकिकडून दिलेल्या सादाला
पलीकडून प्रत्येकवेळी तेवढाच प्रतिसाद नसतो //

अशावेळी न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार
पलीकडच्याची स्थिती नकारातून होकारात
बदलण्यासाठी लागते गरज ऊर्जेची,
आर्जवाची, ईशार्‍याची, पटवण्याची //

कधीकधी न्यूटनच्या दुसर्‍या नियमानुसार
वापरावी श़क्ती आपल्या प्रेमाची
मनाचा वेग जोमाने वाढवण्यासाठी
गतीने प्रेमसाफल्य करण्यासाठी //

मग गरज सम्पते--गुरूत्वाकर्षणाच्या नियमाची
भिती सम्पते, पापणीआडचे लपलेले आसू
गुरूत्वाकर्षणामूळे खाली निसटून
त्याच्या वा तिच्या ओन्जळीत पडण्याची //

विवेक ताटके

गुलमोहर: 

विवेकदा....
न्युटन Equal & opposite म्हणतो. इक्वल नसला तरी अपोझिट रिस्पॊन्स नक्कीच मिळतो. Wink

कविता नेहमीप्रमाणेच सुरेखच ! Happy आय. डी. बदललात काय?

हटके. न्यूटनलासुद्धा सुचले नसते असे. मला न्यूटनचा दुसरा नियम अन तिसरे कडवे सगळ्यात जास्त आवडले. Wink