आनन्दाचा पत्ता

Submitted by VivekTatke on 27 February, 2008 - 07:06

आनन्दाच्या ठावठिकाणा विचारता
लोकान्नी मला तुझा पत्ता दिला
आणि माझ्या हर्षित मनाने
दारी तुझ्या पारीजात सान्डला //

तुझ्या घरावरून आलेला वारा जेव्हा
तुझी खुशाली सान्गू लागला
तेव्हा तो वारा उनाड न वाटता
आपुलकीचा यार वाटू लागला //

तुझ्या मनाला न्हाऊ घालणारा
पाऊस जेव्हा मला भेटू लागला
तेव्हा तो वैताग न वाटता
मला मनापासून आवडू लागला //

रात्रीचा प्रहर जेव्हा तुझ्या पदरी
धुन्द तारकान्चे दान देऊ लागला
तेव्हा तो प्रहर विराण न ठरता
माझ्या श्वासाश्वासात भिनू लागला //

तुझ्या स्पन्दनान्चा आरोह - अवरोह
जेव्हा मैफील रन्गवू लागला
तेव्हा माझ्या उष्ण श्वासान्ना
एकरूपतेचा गन्ध चढू लागला //

विवेक ताटके

गुलमोहर: 

छान